शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांच्या काँक्रिटीकरणालाच भेगा

By admin | Updated: May 6, 2016 01:04 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील प्रमुख रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम महापालिकेने २०१० साली हाती घेतले. पाच वर्षे उलटून गेली तरी ही कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत.

- मुरलीधर भवार, डोंबिवलीकल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील प्रमुख रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम महापालिकेने २०१० साली हाती घेतले. पाच वर्षे उलटून गेली तरी ही कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. कामाची गती संथ आहे. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. ही कामे नक्की किती वेळेत पूर्ण होतील, याची कोणतीही हमी पालिका प्रशासन देऊ शकत नाही. या कामासाठी राज्य सरकारकडूनही निधी आला. त्यामुळे निधीची कमतरता हा मुद्दा नाही, तर निधीचा विनियोग, नियोजन आणि पाठपुरावा महत्त्वाचा आहे. आता महिनाभरात पावसाळा सुरु होईल. त्यानंतर पुन्हा चार महिने रस्ते विकासाला ब्रेक लागेल. त्या पार्श्वभूमीवर कामाच्या प्रगतीचा लेखाजोखा... 2010मध्ये महापालिका क्षेत्रात रस्त्याच्या दुरवस्थेचा कहर झाला होता. दरवर्षी डांबरीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च करुन रस्ते सुस्थितीत नव्हते. रस्ते खराब असतानाही महापालिकेला रस्ते चांगले असल्याचा पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे महापालिका टीकेचे लक्ष्य बनली होती. २०१० च्या महापालिका निवडणुकीच्या प्रचारात शहरातील रस्ते सिमेंट कॉंक्रीटचे करण्याचे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले होते. तेव्हा राज्यात आघाडीचे सरकार होते. आघाडी सरकारने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात रस्ते विकासासाठी पालिकेला 301कोटींचा निधी दिला. नंतर दुसऱ्या टप्प्यात पुन्हा 100कोटी रुपये दिले. पालिकेने पहिल्या टप्प्यात कल्याण पूर्व, पश्चिमेतील प्रमुख आणि जास्त लांबीच्या रस्त्यांची काँंक्रीटीकरणासाठी निवड केली. पुनर्वसनाचा तिढापहिल्या टप्प्यातील कल्याण पूना लिंक रोड, श्रीराम टॉकिज ते चक्कीनाका या रस्त्याचे काम श्रीराम टॉकीज ते काटेमानवलीपर्यंत झाले आहे. गणपती मंदिर ते तीसगाव नाका हे काम अद्याप झालेले नाही. हा रस्ता ५० ते ४० फुटी करण्यावरुन पुन्हा वाद निर्माण झाला आहे. रस्ते विकासामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांनी आधी पुनर्वसन करण्याची मागणी केली. त्यासाठी पुनर्वसन कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. रस्ते विकासात बाधित झालेल्यांना बीएसयूपी प्रकल्पात घरे देण्याचे आश्वासन महापालिकेने दिले होते. त्याची पूर्तता झालेली नाही. मुरबाड डायव्हर्शन रोड, आधारवाडी, गांधारी रोड यांची कामे पूर्ण झाली आहेत. दुसऱ्या टप्प्यात कल्याण डोंबिवलीतील १९ रस्ते महापालिकेने विकसित करण्याचे काम हाती घेतले. या रस्ते विकासासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानांतर्गत १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. या टप्प्यात कल्याण मुरबाड रोड, गोल्डन पार्क, आधारवाडी ते लाल चौकी, दीपक हॉटेल ते महंमद अली चौक, काळी मशीद, बेतूरकरपाडा, संतोषीमाता रोड या रस्त्यांसह डोंबिवलीतील फडके चौक ते बाजीप्रभू चौक- मानपाडा रोड, टंडन रोड, स्टेशन रस्ता, बाजीप्रभू चौक ते इंदिरा गांधी चौक, दीनदयाळ रोड, कोपर रोड, महात्मा गांधी रोड, विवेकानंद रोड, राजाजी पथ यांचा समावेश आहे. ती कामे सध्या टप्प्याटप्प्याने सुरू आहेत. निकृष्ट कामाचा फटकासिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामाला सुरूवात झाली, पहिला टप्पा कसाबसा पूर्ण झाला आणि काही ठिकाणी रस्त्यांना तडे गेले. त्यामुळे त्याच्या गुणवत्तेविषयी प्रश्न उपस्थित केले गेले होते. त्याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. थर्ड पार्टीकडून आॅडीट करण्याची मागणी झाली. त्यानंतर पालिकेने व्हिजेटीआयला गुणवत्ता तपासणीचे काम दिले. त्यासाठी ५० लाखांचा मोबदला दिला. काम काही ठिकाणी योग्यप्रकारे झालेले नाही, असा अहवाल व्हिजेटीआयने दिला. कोट्यवधी रुपये खर्च करुनही काम चांगले होणार नसेल त्याचा काय उपयोग, पुन्हा त्यातील खड्डे बुजवायचे का, असा सवाल उपस्थित झाला. व्हिजेटीआयच्या अहवालानंतर ज्या कंत्राटदारांची कामे निकृष्ट असल्याचे आढळले होते, त्यांची बिले महापालिकेने रोखून धरली. तसेच त्यांच्याकडूनच ते काम पुन्हा करुन घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. अर्थात निकृष्ट आढळलेल्या कामाचे प्रमाण हे पाच ते सात टक्के इतकेच होते, अशी सारवासारव नंतर महापालिका प्रशासनाने केली.वाहतूक पोलिसांवर खापर एकाच वेळी सगळे रस्ते खोदण्यास वाहतूक पोलिसांकडून परवानगी दिली जात नसल्याने रस्ते विकासाला बिलंब होतो, काँक्रीटीकरण लांबते, असे खापर महापालिकेकडून फोडण्यात येते; तर शहरभर सर्वत्र वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी सगळ््या रस्त्याची कामे एकाच वेळी करण्यास परवानगी दिली जात नाही, असे वाहतूक शाखेकडून सांगण्यात येते. या दोन्ही यंत्रांचे दावे जरी योग्य असले तरी शहरभर कामे सुरू आणि त्याचवेळी कोंडीही कायम अशी स्थिती निर्माण झालेली आहे. सेवा वाहिन्यांचा घोळ : महापालिकेने रस्ते विकासाचे काम हाती घेतले. त्यावेळी सेवा वाहिन्या हलविण्यासाठी कामाच्या एकूण रकमेच्या तुलनेत तीन टक्के रक्कम ठेवण्याऐवजी नऊ कोटी रुपयांची तरतूद केली होती. ही तरतूद अत्यंत कमी होती. त्यासाठी पुन्हा ४६ कोटी रुपये खर्च करण्याची वेळ आली. त्याला महापालिकेने मंजुरी दिली. हा खर्च महापालिकेच्या तिजोरीतून करावा लागला. त्यानंतर आता सेवा वाहिन्या हटविण्याचे काम सुरुच आहे.