शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रियाजची हत्या कशाने? पोलीस संभ्रमात : गोळीबार झाल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 01:55 IST

हुक्का पार्लरला विरोध दर्शवणारा रिक्षाचालक रियाज शेख याच्यावर मारेक-यांनी गोळीबार केला असा आरोप त्याच्या नातेवाइकांनी केला आहे. तर रियाजनेच कट्टा व तलवारीचा वापर केला, असे मारेक-यांनी पोलिसांना सांगितले. दरम्यान, मारेक-यांनी बंदुकीचा वापर केला होता का, याबाबत पोलीस संभ्रमात आहेत.

कल्याण : हुक्का पार्लरला विरोध दर्शवणारा रिक्षाचालक रियाज शेख याच्यावर मारेकºयांनी गोळीबार केला असा आरोप त्याच्या नातेवाइकांनी केला आहे. तर रियाजनेच कट्टा व तलवारीचा वापर केला, असे मारेकºयांनी पोलिसांना सांगितले. दरम्यान, मारेकºयांनी बंदुकीचा वापर केला होता का, याबाबत पोलीस संभ्रमात आहेत.पूर्वेतील कचोरे येथील शर्मा चाळीच्यासमोर हुक्का पार्लर सुरू करण्याच्या प्रयत्नात साजिद सय्यद होता. शेखने त्यास विरोध केला होता. शुक्रवारी रियाज व साजिद यांच्यात झालेली वादावादी टिळकनगर पोलीस ठाण्यापर्यंत पोचली. पोलिसांनी या दोघांवर परस्परविरोधी अदखलपात्र गुन्हे नोंदवले. त्यांतर शनिवारी सायंकाळी रियाजची हत्या झाली.रियाजच्या हत्येची प्रत्यक्ष साक्षीदार असलेली त्याची पत्नी निलोफर हिने साजिदने रियाजवर गोळी झाडल्याचा आरोप केला आहे. तर मारेकºयांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, रियाजनेच कट्टा आणि तलवार वापरली आहे. रियाजने केलेल्या हल्ल्यात इरफान याच्या उजव्या हाताला जखम झाली. तर दुसरीकडे रियाजच्या शरीरात गोळी घुसल्याचेही डॉक्टरांनी नाकारले. मात्र, गोळी कपाळाला घासून गेल्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केल्यामुळे त्याच्या कपाळाचा काही भाग तांत्रिक तपासणीकरता मुंबईतील जे. जे. रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.गंभीर गुन्ह्यांची नोंद-रियाज शेख हा ‘मेंटल’ नावानेही ओळखला जात होता. कल्याणचे बाजारपेठ पोलीस ठाणे, उल्हासनगरचे हिललाइन पोलीस ठाणे, कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात अनेक गंभीर गुन्ह्यांच्या नोंदी आहेत. दागिने लुटण्यात हातखंडा असलेला रियाज सध्या जामिनावर मुक्त होता. हल्ल्याच्या वेळी त्यानेही शस्त्र बाळगले असल्याची जबानी आरोपींनी दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी धुमाळ यांनी दिली.

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखून