शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

रितेश-जिया ठाणेकरांना देणार जोश, मॅरेथॉनला स्पर्धकांमध्ये जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 06:39 IST

‘वेड’ या आगामी चित्रपटाचे मॅरेथॉनमध्ये करणार प्रमोशन

लाेकमत न्यूज नेटवर्कठाणे : जल्लोष, आनंद आणि उत्साहाच्या वातावरणात रविवारी पार पडणाऱ्या ‘लोकमत’ महामुंबई महामॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री जिया शंकर हे ठाण्यात येणार आहेत. वेड या त्यांच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन मॅरेथॉनमध्ये केले जाणार आहे. 

रविवार, दि. ४ डिसेंबरला रेमंड ग्राऊंड येथून ‘लोकमत’ महामुंबई महामॅरेथॉनला सुरुवात होईल. धावपटूंचा उत्साह, आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि त्यांचे कौतुक करण्यासाठी रितेश-जिया या महामॅरेथॉनला उपस्थित राहणार आहेत. २० वर्षे अभिनय कारकीर्द गाजवल्यानंतर अभिनेते रितेश हे एका आगळ्यावेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ३० डिसेंबर रोजी त्यांचा ‘वेड’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः रितेश यांनी केले आहे. तसेच, या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जेनेलिया देशमुख या मराठी चित्रपटात पदार्पण करत आहेत. यापूर्वी जेनेलिया यांनी हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम अशा तब्बल पाच भाषिक चित्रपटांत काम केले आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे व अभिनेत्री  जिया शंकर आदी कलाकार  या चित्रपटात भूमिका साकारत आहेत. आघाडीचे संगीतकार अजय-अतुल यांनी वेड चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेत तर गीते अजय-अतुल आणि गुरू ठाकूर यांनी लिहिली आहेत.

टॅग्स :thaneठाणेRitesh Deshmukhरितेश देशमुखMarathonमॅरेथॉन