शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ऐन निवडणुकीत उल्हासनगरात रिपाइंतील वाद चव्हाट्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 00:08 IST

रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश बारसिंगे यांनी भगवान भालेराव यांच्या अधिकृत उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले

- सदानंद नाईकउल्हासनगर : रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश बारसिंगे यांनी भगवान भालेराव यांच्या अधिकृत उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले असतानाही, राज्यमंत्र्यांच्या तोंडी आदेशान्वये भाजपचे उमेदवार कुमार आयलानी यांना जाहिर पाठिंबा दिल्याची माहिती शहर कार्यकारिणीच्या काही पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे भगवान भालेराव संतापले असून, पत्रकार परिषद घेणाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे प्रसिद्धिपत्रक शहर कार्यकारिणीतील उपाध्यक्ष सज्जन शेकटे यांनी काढले आहे. याप्रकाराने ऐन निवडणुकीच्या काळात रिपाइंतील वाद चव्हाट्यावर आला आहे.

उल्हासनगर मतदारसंघात भाजपचे कुमार आयलानी आणि राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी यांच्यात थेट लढत होती. मात्र, रिपाइंचे शहर जिल्हाध्यक्ष तथा गटनेते भगवान भालेराव यांनी निवडणूक रिंगणात उतरून रंगत आणली आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश बारसिंगे यांनी पत्रकार परिषद घेऊन भालेराव यांना तांत्रिक कारणाने पक्षाचा एबी फॉर्म मिळाला नसल्याचे स्पष्ट करत, ते पक्षाचे अधिकृत उमेदवार असल्याचे सांगितले. भालेराव यांच्यामुळे शहरात तिरंगी लढत निर्माण झाली. बुधवारी रिपाइंच्या काही पदाधिकाºयांनी कुमार आयलानी यांच्या समक्ष टाउन हॉलमध्ये पत्रकार परिषद घेऊन आयलानी यांना पाठिंबा घोषित केला. पक्षाचे नेते, राज्यमंत्री अविनाश महातेकर यांच्या तोंडी आदेशान्वये भाजपला पाठिंबा घोषित केल्याची माहिती यावेळी राजू सोनावणे यांनी दिली.

रिपाइंतील काही पदाधिकाºयांनी आयलानी यांना पाठिंबा घोषित केल्याने, रिपाइंचे उमेदवार भगवान भालेराव यांनी आश्चर्य व्यक्त केले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना सर्व प्रकार माहीत असून माझा निवडणूक जाहीरनामा त्यांना दिल्याचेही भालेराव यांनी सांगितले. असे असताना पक्षाच्या काही स्थानिक पदाधिकाºयांनी घेतलेल्या भूमिकेबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर, शहर कार्यकारिणीचे उपाध्यक्ष सज्जन शेकटे यांनी प्रसिद्धिपत्रक काढून आयलानी यांना पाठिंबा देणाºयांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे सांगितले. या प्रकाराने ऐन निवडणुकीत पक्षातील वाद चव्हाट्यावर आला आहे. शहर कार्यकारिणीतील मोजके पदाधिकारी सोडल्यास इतर पदाधिकारी माझ्यासोबत असल्याचा दावाही भगवान भालेराव यांनी केला.मतदारसंघात तिरंगी लढतमतदारसंघात सुरुवातीला भाजपचे कुमार आयलानी आणि राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी यांच्यात थेट लढत होती. मात्र, निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात तिरंगी लढत होण्याचे चित्र शहरात आहे. शहरात रिपाइंची ताकद मोठी असून आंबेडकरी समाजाची लोकसंख्या ४० हजारांपेक्षा जास्त आहे. भगवान भालेराव यांच्यासह रिपाइंचे तीन नगरसेवक असून यामध्ये धर्मपत्नी अपेक्षा भालेराव यांचाही समावेश आहे.