भातसा धरणाचा उजवा तीर कालवा फुटला , शेतात शिरले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:42 AM2018-02-26T00:42:32+5:302018-02-26T00:42:32+5:30

येथील भातसा धरणाचा उजवा तीर कालवा शनिवारी सकाळी सातच्या सुमारास तालुक्यातील आवरे गावाजवळ फुटल्याने शेतात पाणी शिरले. यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले.

 The right arrow of the Bhatsa Dam is blocked by the canal, the water entered into the fields | भातसा धरणाचा उजवा तीर कालवा फुटला , शेतात शिरले पाणी

भातसा धरणाचा उजवा तीर कालवा फुटला , शेतात शिरले पाणी

Next

शहापूर : येथील भातसा धरणाचा उजवा तीर कालवा शनिवारी सकाळी सातच्या सुमारास तालुक्यातील आवरे गावाजवळ फुटल्याने शेतात पाणी शिरले. यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले.
शेतकºयांना दुबार पिके घेता यावी यासाठी दरवर्षी भातसा धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडले जाते. साधारण डिसेंबर महिन्यापासून पाणी सोडण्यास सुरूवात केली की ते एप्रिलपर्यंत राहते. परंतु हा उजवा कालवा इतका कमकूवत झालेला आहे की जरा क्षमतेपेक्षा जास्त वेगाने पाणी सोडले की कालव्याला ठिकठिकाणी भगदाड पडतात आणि कालवा फुटण्याचे प्रकार होतात.
भातसा प्रकल्पातंर्गत बांधण्यात या भातसा उजवा तीर कालव्याची लांबी ९१ मीटर आहे. वज्रेश्वरी, भिवंडी, तानसा, दिघाशी, दुमाडी, कामवारी, उल्हास, आणि कुंभारी या शाखा कालव्याद्वारे सुमारे १६६८० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचा उद्देश आहे. शहापूर तालुक्यात ५४ किलोमीटर इतक्या लांबीत पसरला आहे.
सकाळी कालवा फुटल्याची माहिती मिळताच आमदार पांडुरंग बरोरा यांनी आवारे गावाला भेट देऊन पाहणी केली. सोबत चेरपोली ग्रामपंचायतीचे उप सरपंच विट्ठल भेरे होते. त्यांनी शेतकºयांना सरकारकडून नुकसानभरपाई मिळवून देऊ असे आश्वासन दिले.
आमदार बरोरा म्हणाले, हा कालवा ४० वर्षपूर्वीचा आहे. पाणी सोडल्यानंतर कुठे ना कुठे कालवा फुटून शेतकºयांचे नुकसान होते. या कालव्याचे सर्वेक्षण करून पुन्हा बांधण्याची गरज आहे. या संबंधी मी गेल्यावर्षी विधानसभेत हा प्रश्न मांडला होता. आता सरकारने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. फुटलेल्या कालव्यासंदर्भात या विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्याशी बोलून तातडीने या कालव्याची दुरु स्ती करा असे सांगितले.
या संदर्भात भातसा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एस. सोनावणे यांना विचारले असता त्यांनी सांगितले तातडीने भातसा धरणातून सोडण्यात आलेले पाणी बंद करतो. म्हणजे शेतकºयांचे नुकसान होणार नाही.
येथील शेतकºयांनी कारली, भेंडी, भात आणि कडधान्य आदींची पिके लावली होती. शनिवारी अचानक कालवा फुटून शेतात पाणी शिरले. सुरूवातीला संबंधित विभागाच्या कार्यालयाला फोन करून कळवण्याचा प्रयत्न केला. परंतु कोणीच फोन उचलला नाही. त्यानंतर आमदार बरोरा यांना फोन लावला असता ते तातडीने आले. सरकारकडून नुकसान भरपाई मिळायला हवी.
- अनंता म्हाळुंगे, शेतकरी.

Web Title:  The right arrow of the Bhatsa Dam is blocked by the canal, the water entered into the fields

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.