शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकांना दीड हजाराची मदत मिळायला जून महिना उजाडणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 23:29 IST

अद्याप सॉफ्टवेअरचा पत्ता नाही : कल्याण आरटीओची माहिती

अनिकेत घमंडी

डोंबिवली : कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध घातले आहेत. मात्र, या काळात रिक्षाचालकांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांना प्रत्येकी दीड हजार रुपयांची मदत जाहीर केली. मात्र, कल्याण आरटीओ हद्दीतील सुमारे ६० हजार रिक्षाचालकांना ही मदत मिळण्यास किमान महिनाभराची प्रतीक्षा करावी लागणार आहे. जूनमध्ये त्याचा शुभारंभ होण्याची शक्यता आहे.

याबाबत आरटीओ अधिकारी तानाजी चव्हाण म्हणाले की, राज्य सरकारच्या घोषणेनुसार पात्र रिक्षाचालकांना दीड हजाराचे वाटप करण्यासाठी एक सॉफ्टवेअर बनविण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी महिना लागणार असल्याचे वरिष्ठ पातळीवरून सांगण्यात आले होते. हे सॉफ्टवेअर कल्याण आरटीओला कार्यालयाला मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी होईल.  अडचणी आणि प्रत्यक्ष मदत, यासाठी लागणारा कालावधी लक्षात घेता साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यात त्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मदत देताना त्यात पारदर्शकता असावी, यासाठी ती थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

रिक्षांच्या युनियनसाठी एखादी लिंक तयार करून त्याद्वारे माहिती संकलनाचे काम सुरू असल्याचे ऐकिवात होते; परंतु तसे काहीही नाही. आरटीओनेही अजून कोणतीही माहिती मागवलेली नाही.    - दत्ता माळेकर,     अध्यक्ष,     वाहतूक     सेल, कल्याण      जिल्हा,     भाजप

मुख्यमंत्र्यांनी रिक्षाचालकांना मदत मिळेल असे जाहीर केले; पण त्यानंतर आता दुसऱ्यांदा कडक निर्बंध वाढविले असून, मदत मिळालेली नाही. आरटीओकडे सगळ्यांचे डोळे लागलेले आहेत. मदत वेळेवर मिळाली तरच त्याचा खरा फायदा, अन्यथा रोजच्या समस्या वाढत असून, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, हा अनेकांना प्रश्न आहे.    - शेखर जोशी, उपाध्यक्ष,     रिक्षा चालक-मालक युनियन.

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्या