शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जाचे हप्ते भरण्यसाठी बँकांकडून लावण्यात येत असलेल्या तगाद्याविरोधात रिक्षाचालक करणार लाक्षणिक उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 10:37 IST

डोंबिवली - कर्ज फेडीसाठी बँका आणि वित्तीय संस्थाकडून होणारा त्रास थांबत नसून तो वाढतच असल्याने राज्य शासन, बँका आणि ...

डोंबिवली - कर्ज फेडीसाठी बँका आणि वित्तीय संस्थाकडून होणारा त्रास थांबत नसून तो वाढतच असल्याने राज्य शासन, बँका आणि अन्य खासगी वित्तीय संस्थांच्या विरोधात 24 सप्टेंबर, गुरुवार रोजी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण, आंदोलन करणार असल्याची माहिती भाजप कल्याण जिल्हा वाहतूक सेलचे अध्यक्ष दत्ता माळेकर यांनी दिली.रिक्षा चालकांच्या मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी इंदिरा गांधी चौक ,डोंबिवली पूर्व येथे कोविडच्या काळात फिजिकल डिस्टन्ससह कायदा सुव्यवस्थेचे सर्व नियम पाळून हे आंदोलन करण्यात येणार आहे. केंद्राने कर्जाचे हफ्ते भरण्यासाठी केवळ तीन महिन्यांची मुदत दिली होती. ती मुदत केव्हाच संपली आहे .रेल्वे सेवा कदाचित ऑक्टोबर दरम्यान सुरु होतील मात्र शाळा महाविद्यालये डिसेंबर पर्यंत सुरु होतील ,अशी चिन्हे दिसत नाही. त्यामुळे तोपर्यंत रिक्षाचालकांचा व्यवसाय होणार नाही, हे लक्षात घेवून रिक्षाचालकांनी घेतलेले कर्ज परतफेड करण्यासाठी असणारी मुदत डिसेंबर अखेर पर्यंत वाढवावी, ही प्रमुख मागणी आहे.शासन निर्णयानुसार नवीन रिक्षा घेण्यासाठी बँका आणि वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतले आहे. मात्र कोविड प्रादुर्भाव वाढल्यानंतर मार्च पासून पाच महिने राज्यात लॉक डाऊन होता. त्यावेळी केंद्र सरकारने कोणत्याही कर्जदाराला थकीत वसुलीसाठी त्रास देवू नये, असे स्पष्ट बजावले होते. मात्र तरीही देखील वित्तीय संस्थांमार्फत रिक्षाचालकांना नाहक त्रास देण्याचे सत्र सुरूच आहे. आता सप्टेंबरमध्ये अनलॉक झाले असले तरी सर्व उद्योग व्यवसाय पूर्णतः सुरु झालेले नाहीत . प्रवासी मिळत नाहीत . कोविडचा प्रादुर्भाव अजूनही ओसरलेला नाही ,त्यातच सोशल डीस्टसिंगचे नियमामुळे प्रवाशांनी रिक्षाकडे पाठ फिरवली असल्याने अपेक्षेप्रमाणे रिक्षाचालकांचा व्यवसायच होत नाही . या व्यवसायातून इंधनाचे पैसे देखील मिळत नाही ,अशी गंभीत स्थिती असल्याने रिक्षाचालक मानसिक तणावाखाली असल्याचे ते म्हणाले .

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाdombivaliडोंबिवलीCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक