शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी महानगरपालिका मुख्यालय आवारात रिक्षा चालकाची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 12:53 IST

भिवंडी महानगरपालिका मुख्यालय इमारतीच्या आवारातील झाडाला गळफास घेऊन एका रिक्षा चालकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

भिवंडी - भिवंडी महानगरपालिका मुख्यालय इमारतीच्या आवारातील झाडाला गळफास घेऊन एका रिक्षा चालकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मंगळवारी (18 सप्टेंबर )  सकाळी ही घटना उघडकीस आली. गुलाम नबी शेख (45) असे आत्महत्या करणाऱ्या रिक्षा चालकाचे नाव आहे. 

गुलाम नबी शेख हे  गुलजार नगर, नुरानी मस्जीद जवळ राहत होते. रिक्षा चालवून ते आपल्या कुटुंबियांचे पालन पोषण करत होते. परंतु दोन वर्षांपूर्वी पत्नीसोबत झालेल्या कौटुंबिक वादानंतर पत्नी दोन मुलांसह वेगळी झाली. त्यानंतर गुलाम नबी हे मानसिक तणावात असल्याची माहिती त्याचे भाऊ गुलाम मोहम्मद याने दिली आहे. काल रात्री दीड वाजताच्या सुमारास ते घरी रिक्षा घेऊन आले व त्यानंतर पुन्हा घराबाहेर गेल्याची माहिती कुटुंबियांनी दिली.

मंगळवारी सकाळी महानगरपालिका मुख्यालय इमारतीच्या संरक्षक भिंती लगत असलेल्या झाडाच्या फांदीला दोरखंडाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनस्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे. ही दुर्घटना ज्या ठिकाणी घडली ते घटनास्थळ मनपा मुख्यालय प्रवेशदाराच्या अगदी समोर असुन त्याठिकाणी चोवीस तास  सुरक्षा रक्षक तैनात असतात. त्यामुळे सुरक्षा रक्षकांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे . 

टॅग्स :Suicideआत्महत्याbhiwandiभिवंडी