शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
3
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
4
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
5
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
6
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
7
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
8
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
9
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
10
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
11
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
12
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
13
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
14
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
15
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
16
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
17
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
18
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
19
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
20
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

श्रीमंत महापालिकांनी थकविले ८३४ कोटी, दहा वर्षांपासूनची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 01:23 IST

महापालिका महाराष्ट्र मोटर वाहन कायदा १९५८ अन्वये स्थानिक स्वराज्य संस्था प्रवाशांकडून विविध स्वरूपाचे कर आकारत असतात. प्रवाशांकडून कर रूपात आकारण्यात आलेली ही रक्कम महाराष्ट्र सरकारकडे जमा करणे नियमानुसार बंधनकारक आहे.

ठाणे :   महापालिका महाराष्ट्र मोटर वाहन कायदा १९५८ अन्वये स्थानिक स्वराज्य संस्था प्रवाशांकडून विविध स्वरूपाचे कर आकारत असतात. प्रवाशांकडून कर रूपात आकारण्यात आलेली ही रक्कम महाराष्ट्र सरकारकडे जमा करणे नियमानुसार बंधनकारक आहे.  मात्र, राज्यातील श्रीमंत समजल्या जाणाºया मुंबई, नवी मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर आणि ठाण्यांसारख्या महानगर पालिकांनी प्रवाशांकडून वसूल केलेला तब्बल ८३४ कोटींचा कर थकविला असल्याची धक्कादायक माहिती, माहिती अधिकारातून समोर आली आहे. यामध्ये प्रवासी कर आणि बालपोषण अधिभारासारख्या महत्त्वाच्या करांचा समावेश आहे. दहा वर्षांपासूनची ही थकबाकी असल्याने, परिवहन विभागाने त्यावर १६७ कोटी रुपयांचा दंड या महापालिकांना लावला आहे. मात्र, या महापालिकांनी या वसुलीला केराची टोपली दाखिवल्याने, बालकांच्या हितांचे हे कोट्यवधी रुपये त्यांच्यावर खर्च करता आलेले नाहीत.स्थानिक स्वराज्य संस्थांकडून प्रवाशांच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र परिवहनसेवा चालविली जाते. प्रवाशांच्या या वाहतुकीदरम्यान ही संस्था प्रवाशांकडून लोकहितासाठी विविध कर आकारते. त्यामध्ये प्रवासी कर आणि बालपोषण अधिभाराचाही समावेश असतो. स्थानिक स्वराज्य संस्थेकडून हा कर सरकारकडे जमा केला जातो. असा कर महाराष्ट्रामधील पुणे, कोल्हापूर, मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबई महानगर पालिकेने प्रवाशांकडून वसूल केलेला आहे. मात्र, प्रवाशांकडून वसूल केलेला हा कर त्यांनी शासनाकडे जमाच केलेला नाही.२००७ पासून या महापालिकांनी कर थकविला आहे. त्यामुळे थकबाकीची रक्कम तब्बल ८३३ कोटी ७७ लाख १ हजार ४१३ एवढी झाली आहे. त्यामध्ये ४७४ कोटी ५५ लाख ४९ हजार २३९ एवढी रक्कम प्रवासी कराची असून, १९२ कोटी ४६ लाख ११ हजार ८९० एवढा कर बालपोषणाचा आहे. एवढे महत्त्वाचे हे कर असतानाही ते शासनाकडे जमा न केल्याने, राज्यातील गरजू बालकांच्या हिताला खीळ बसत आहे, तर इतरही महत्त्वाच्या जनहिताच्या योजना ठप्प झाल्या आहेत. या रकमा न भरल्याने, त्या रकमेवर तब्बल १६६ कोटी ७५ लाख ४० हजार २८४ रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.याबाबत परिवहनमंत्री दिवाकर रावते आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडूनही त्यांच्या खात्याच्या थकीत रकमेसाठी कठोरपणे पाठपुरावा केला जात नसल्याचीही बाब, या निमित्ताने समोर येत असल्याने, या विभागांना प्रवासी आणि बालकांच्या हिताची किती काळजी आहे का? हे स्पष्ट होत आहे.दरम्यान, प्रवाशांकडून कर रूपाने वसूल केलेली ही रक्कम संबंधित विभागाकडे जमा केली नाही, तर संबंधित संस्थांच्या वाहनांवर कायद्याच्या कलम १० नुसार वाहतुकीसाठी प्रतिबंध करता येतो, तसेच कलम ८ नुसार या थकीत रकमेवर २५ टक्के दंड लावला जातो. त्यांमुळे बालकांच्याहितासाठी वापरला जाणारा हा कोट्यवधी रुपयांचा प्रवाशांनी दिलेला कर थकविणाºया महानगर पालिकेच्या मालकीच्या गाड्या जप्त कराव्यात, अशी प्रतिक्रिया माहिती अधिकार कार्यकर्ते राजीव दत्ता यांनी दिली आहे.कर थकविणा-या महापालिका...पुणे महापालिका : प्रवासी कर १६३ कोटी ६३ लाख १९ हजार १४६, बालपोषण अधिभार ६७ कोटी ७६ लाख १० हजार ४६४, दंड ५७ कोटी ८४ लाख ८२ हजार ४०३ रुपये.नागपूर महापालिका : प्रवासी कर १० कोटी ३१ लाख २२ हजार ६३१, बालपोषण अधिभार ३ कोटी ४१ लाख ७० हजार ९४०, दंड ३ कोटी ४३ लाख २३ हजार ३९३बेस्ट परिवहन उपक्र म : प्रवासी कर २४९ कोटी २८ लाख ४४ हजार २७३, बालपोषण अधिभार ९६ कोटी ३३ लाख ५७ हजार ९९२, दंड ८६ कोटी ४० लाख ५० हजार ५५६.नवी मुंबई महापालिका : प्रवासी कर १७ कोटी ६१ लाख ८३ हजार ४३६, बालपोषण अधिभार ६ कोटी ८ लाख ६९ हजार ४८९, दंड ५ कोटी ९२ लाख ६३ हजार २३१,कल्याण-डोंबिवली : प्रवासी कर ६ कोटी ८२ लाख ७६ हजार ४५६, बालपोषण अधिभार ३ कोटी ६२ लाख ५० हजार १९४, दंड २ कोटी ६१ लाख ३१ हजार ६६३.कोल्हापूर महापालिका : प्रवासी कर ८ कोटी ७१ लाख ४३ हजार ४९८, बालपोषण अधिभार ५ कोटी ७८ लाख ८७ हजार ९३२, दंड ३ कोटी ६२ लाख ५७ हजार ८५८,ठाणे महापालिका : प्रवासी कर १७ कोटी ६१ लाख ८३ हजार ४३६, बालपोषण अधिभार ९ कोटी ७९ लाख ९ हजार १७९, दंड ७ कोटी ३६ लाख ३१ हजार ८९४,