शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात महापौरांनी घेतली आढावा बैठक, पर्यावरण दिनानिमित्त दिली हरीत शपथ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 16:01 IST

Ulhasnagar News : उल्हासनगर महापालिकेवर शिवसेना मित्र पक्षाची सत्ता असून महापालिकेच्या विविध विभागात सावळागोंधळ निर्माण झाल्याची टीका होत आहे.

सदानंद नाईक 

उल्हासनगर - गणेशोत्सवानिमित्त महापौर लिलाबाई अशान यांनी आयुक्तांच्या उपास्थित अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन विकास कामाबाबत सूचना दिल्या. तसेच पर्यावरण विभागामार्फत माझी वसुंधरा अभियानातील हरीत शपथ महापौरांनी उपस्थितीना यावेळी दिली आहे. 

उल्हासनगर महापालिकेवर शिवसेना मित्र पक्षाची सत्ता असून महापालिकेच्या विविध विभागात सावळागोंधळ निर्माण झाल्याची टीका होत आहे. दरम्यान महापौर लिलाबाई अशान यांनी गणेशोत्सव निमित्त शुक्रवारी आयुक्त डॉ राजा दयानिधी, उपायुक्त अशोक नाईकवाडे यांच्या उपस्थित अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. सुरुवातीला त्यांनी देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे सांगून सर्वांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना केले. तसेच गणेश भक्तांनी बाप्पाच्या विसर्जनासाठी महापालिकेच्या मूर्ती संकलन केंद्राचा उपयोग करावा असा सल्ला गणेश मंडळ व गणेश भक्तांना दिला. 

महापौरांनी आढावा बैठकीत केंद्र शासन व राज्य शासनामार्फत प्राप्त झालेल्या निधीतून सुरू असलेले काम वेळेत व मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. शहरात अपुर्ण कामांची माहिती घेऊन, ती पूर्ण करणे, सफाई कामगारांचे हजेरी शेड दुरुस्ती करणे, नामकरण केलेल्या रस्त्यांना एकाच आकाराचे व एकाच रंगाचे नामफलक लावणे, उल्हास स्टेशन स्कायवॉक, अग्निशमन विभाग अद्यावत मशिनरी व यंत्रणेसह ठेवणे, आवश्यकतेनुसार वाहन खरेदी करणे, उद्यान विभाग स्वतंत्र ठेवून, एजन्सी द्वारे कर्मचारी व देखभाल दुरुस्तीचा प्रस्ताव प्रस्तावित करणे. आवश्यकतेनुसार कर्मचारी निुयक्ती करणे तसेच पदोन्नतीचे प्रस्ताव प्रस्तावित करणे, महसुली उत्पनवाढी बाबतचे प्रस्ताव प्रस्तावित करणे, दिवाळीपूर्वी मालकी हक्काचे प्रस्ताव मार्गी लावणे.    महापालिका एसटीपी प्लॅन, अद्यावत क्रिडा संकूल, मॅन होल साफ करण्याकरीता रोबोट अशा पुर्णत्वास आलेल्या कामाचे भूमीपूजन व उदघाटन मंत्री महोदयांच्या हस्ते करणे, महापौर व आयुक्त निवास, विश्रामगृह बांधण्याबाबतच्या प्रस्तावावर कार्यवाही करणे, एल.ई.डी. दिवे बसविणे, परीवहन सेवा सुरु करणे आदी अनेक विषयाला महापौरांनी हात घातला. 

आढावा बैठकीतील विषय महत्वपूर्ण - महापौर अशान 

महापौर लिलाबाई लक्ष्मण अशान यांनी आयुक्त डॉ. राजा दयानिधी व उपायुक्त अशोक नाईकवाडे यांच्या उपस्थितीत अनेक विषयावर चर्चा घडवून आणल्याने, बैठकीला वर्गाला स्वरूप आले. बैठकीला स्थायी समिती सभापती दिपक सिरवानी, सार्वजनिक विभागाच्या सभापती डिंपल ठाकूर, नगरसेवक अरुण अशान, कुलवंतसिंह सोहता, स्वप्निल बागूल, उपायुक्त (आरोग्य) मदन सोंढे, उपायुक्त सुभाष जाधव, वैद्यकिय अधिकारी डॉ. दीपक पगारे यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थितीत होते. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरShiv Senaशिवसेना