भिवंडीत रेती माफियांवर महसूल विभागाची कारवाई; १६ लाखांचे बार्ज व सक्शन पंप केले नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 12:55 PM2021-09-09T12:55:07+5:302021-09-09T12:55:15+5:30

पथकाची चाहूल लागताच बार्ज वरील चार व्यक्तींनी पाण्यात उड्या मारून पलायन केले.

Revenue department action against sand mafias in Bhiwandi; 16 lakh barges and suction pumps destroyed | भिवंडीत रेती माफियांवर महसूल विभागाची कारवाई; १६ लाखांचे बार्ज व सक्शन पंप केले नष्ट

भिवंडीत रेती माफियांवर महसूल विभागाची कारवाई; १६ लाखांचे बार्ज व सक्शन पंप केले नष्ट

Next

- नितिन पंडीत

भिवंडी- भिवंडी तालुक्याच्या खाडी पात्रात मोठ्या प्रमाणावर रेती माफियांकडून अनधिकृतपणे रेती उत्खनन केले जात असल्याच्या तक्रारी वाढल्याने भिवंडी उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे व तहसीलदार अधिक पाटील यांनी रेती माफियांवर कठोर कारवाईचे आदेश दिल्या नंतर बुधवारी कशेळी काल्हेर ते कोनगाव या खाडीपात्रात अप्पर मंडळ अधिकारी अतुल नाईक ,भास्कर टाकवेकर यांच्या नेतृत्वाखालील तलाठी पथक बोटीद्वारे गस्त घालीत असताना रेती उत्खनन करणारे दोन सक्शन पंप व एक बार्ज अंजुर व कोनगाव क्षेत्रात आढळून आले.

पथकाची चाहूल लागताच बार्ज वरील चार व्यक्तींनी पाण्यात उड्या मारून पलायन केले. त्या वेळी बार्ज वरील व्यक्तींनी बार्ज वरील व्हॉल्व उघड केल्याने बार्जमध्ये पाणी साचल्याने पथकाने बार्ज त्याच ठिकाणी पाण्यात बुडविला असून दोन सक्शन पंप काल्हेर येथे आणून ते हायड्रोच्या साह्याने पाण्या बाहेर काढून गॅस कटरच्या सहाय्याने सक्शन पंप निष्कासित करण्यात आले आहेत . सदरच्या कारवाईत तब्बल १६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करीत बार्ज मालका विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या कारवाई मुळे रेती माफियां मध्ये खळबळ उडाली आहे .

Web Title: Revenue department action against sand mafias in Bhiwandi; 16 lakh barges and suction pumps destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.