शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

दोन महिन्यांनी परतले मायदेशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 00:29 IST

ग्लोबल वॉर्मिंगचा संदेश देण्यासाठी सफर : ठाणेकर सायकलस्वाराची कथा

स्रेहा पावसकर ।लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ग्लोबल वॉर्मिंगचा संदेश देण्यासाठी मार्चमध्ये १० महिन्यांच्या नियोजित सायकलसफरीवर निघालेले ठाणेकर राजेश खांडेकर हे अर्जेंटिनातील लॉकडाउनमुळे तेथेच अडकले होते. तब्बल दोन महिन्यांनंतर गुरुवारी रात्री ते ठाण्यात परतले. या दोन महिन्यांच्या कालावधीत आलेले विविध अनुभव त्यांनी ‘लोकमत’सोबत शेअर केले. यादरम्यानच्या कठीण प्रसंगात डोंबिवली सायकल क्लब, अर्जेंटिनातील इंडियन कम्युनिटी, भारतीय दूतावास हे देवदूतच ठरल्याचेही त्यांनी सांगितले.

वर्तकनगर येथे राहणारे राजेश खांडेकर हे व्यावसायिक आहेत. वाढते ग्लोबल वॉर्मिंग पाहता राजेश हे विविध देशांतून सायकलसफरी करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देतात. यापूर्वी त्यांनी अनेक सफरी केल्या आहेत. यंदा अर्जेंटिना ते कॅनडा अशा १७ देशांतून राजेश यांची मार्च २०२० ते जानेवारी २०२१ दरम्यानची सफर नियोजित होती. १६ मार्च रोजी सफर सुरू करून ते २२ मार्चला अर्जेंटिनाची राजधानी असलेल्या ब्युनूस आयरस शहरात पोहोचले. तिथे १९ मार्चपासूनच लॉकडाउन सुरू झाल्याने पोलिसांनी त्यांना अडवून चौकशी आणि वैद्यकीय तपासणी केली. तेथील भारतीय दूतावासाच्या मध्यस्थीनंतर राजेश यांची अर्जेंटिनातील एका हॉटेलमध्ये सोय केली गेली. लॉकडाउन संपण्याची वाट पाहत हॉटेलमध्ये तब्बल ३८ दिवस राहिल्यानंतर राजेश यांनी खर्चासाठी सोबत नेलेले पैसै संपले. त्यांनी डोंबिवली सायकल क्लबशी संपर्क केला. त्यामाध्यमातून पुण्यातील शरद जाधव यांनी त्यांना अर्जेंटिनात राहणारे उमेश गुप्ता यांचा नंबर दिला आणि राजेश हे पुढील १२ दिवस गुप्ता यांच्या घरी राहिले. मात्र, लॉकडाउन संपण्याची चिन्हे दिसत नव्हती. याचदरम्यान चिली देशाचे विमान त्यांच्या नागरिकांना घेण्यासाठी अर्जेंटिनात येणार असल्याची माहिती भारतीय दूतावासाने राजेश यांना दिली. त्यांच्या विनंतीवरून अर्जेंटिनात राजेश यांच्यासह ७० भारतीयांनाही त्या विमानात प्रवेश मिळाला. या प्रवासाचे शुल्क सुमारे एक लाख १५ हजार रुपये (१३२५ डॉलर) होते. राजेश यांच्या हातात पैसे नव्हते. त्यांनी तेथील इंडियन कम्युनिटीला संपर्क केला आणि त्याचे प्रमुख मनोज मेघानी हे देवासारखे धावून आले.अर्जेंटिनातील इंडियन कम्युनिटीने राजेश यांना ८०० डॉलरची मदत केली, तर उर्वरित ५२५ डॉलर भारतीय दूतावासांनी कर्जाऊ दिले आणि सुमारे ४० तासांचा अर्जेंटिना- चिली- आॅस्ट्रेलिया- बँकॉक असा प्रवास करून ते दिल्लीत आले. भारतातही कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने दिल्लीत त्यांना सात दिवस क्वारंटाइन केले गेले. त्यानंतर ट्रेनने बॉम्बे सेंट्रल आणि तिथून ठाणे असा प्रवास करत ते दोन महिन्यांनंतर सहीसलामत स्वगृही परतले.

या कालावधीत अर्जेंटिनातही कडक लॉकडाउन होते. पोलीस आणि प्रशासनाच्या सूचनांचे लोक तंतोतंत पालन करत होते. आपल्याकडेही नागरिकांनी त्याचप्रकारे लॉकडाउनचे नियम पाळले पाहिजे. या संपूर्ण प्रवासात मला अर्जेंटिनातील नागरिकांचे, मार्गदर्शक उमेश ठाकूर आणि विविध हितचिंतकांचे सहकार्य मिळाले. पर्यावरण संवर्धनासाठी करत असलेल्या कामाची दखल घेत मला इंडियन कम्युनिटीने ८०० डॉलर भेट दिले. माझी सफर अर्धवट राहिल्याची खंत आहे, मात्र, कोरोनानंतर मी ती नक्की पूर्ण करेन.- राजेश खांडेकर, सायकलस्वार