शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण डोंबिवलीतील त्य़ा २७ गावांची नगरपालिका बनविण्याबाबत पुनर्विचार करा, मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 14:09 IST

वास्तविक २७ गावातील १०० टक्के गावांचा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत राहण्यास विरोध असतानाही दि.२४ जून २०२० रोजी रोजी उद्घोषणा व अधिसूचनेच्या माध्यमातून २७ गावांतील ९ गाव वगळून उर्वरित १८ गावांची स्वतंत्र नगरपरिषद करण्याचा निर्णय घेतला आहे.

कल्याण - कल्याणडोंबिवलीतील २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका बनवावी अशी सर्वांची मागणी होती व तसे ठराव ग्रामपंचायतींच्या माध्यमातून शासनास सादर केलेले होते. त्या अनुषंगाने २०१५ मध्ये या सर्व गावांची मिळून एक नगरपालिका करण्याची अधिसूचना शासनाने काढली होती, परंतु महापालिका निवडणुका आधी ६ महिने हद्दीत फेरफार करता येत नाही, या मुद्द्यावर निवडणूक आयोगाने स्थगिती दिली होती. गेली जवळ जवळ पाच वर्षे स्वतंत्र नगरपालिकेचा विषय स्थगित ठेवला होता. या कालावधीत लोकप्रतिनिधी, सर्व पक्षीय संघर्ष समिती,स्थानिक नागरिकांकडून पाठपुरावा सुरू होता. तसेच विधानसभा आणि विधानपरिषद सभागृहातही हा विषय लोकप्रतिनिधीनी मांडून स्वतंत्र नगरपालिका  करावी अशी मागणी केलेली होती.वास्तविक २७ गावातील १०० टक्के गावांचा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत राहण्यास विरोध असतानाही दि.२४ जून २०२० रोजी रोजी उद्घोषणा व अधिसूचनेच्या माध्यमातून २७ गावांतील ९ गाव वगळून उर्वरित १८ गावांची स्वतंत्र नगरपरिषद करण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक २७ गावांची एकमुखी मागणी असताना, असा निर्णय घेणे अन्यायकारक आहे, त्यामुळे अनेक प्रश्न आज अनुत्तरित राहतात, त्यांचा सारासार विचार करून निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. 

१) सर्व २७ गावांतील जनतेची स्वतंत्र पालिकेची एकमुखी मागणी  होती.२) २७ गावांची वेगळी नगरपालिका स्थापन करण्याची अधिसुचना शासनाने काढली.३) निवडणूक आयोगाने महापालिका निवडणूकी आधी ६ महिन्यांच्या काळात हद्दीत फेरफार करता येणार नाही या मुद्द्यावर स्थगिती दिली होती.४) त्यानंतर आता कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडून हरकती व सूचनांवर विचार करून वस्तुस्थिती अहवाल मागवला.५) यापूर्वी २७ गावांची वेगळी पालिका स्थापन करण्याचा सरकारचा इरादा होता, मग आता अशी कोणती परिस्थिती उद्भवली की अचानक ९ गावे वगळण्यात आली ? ६) नव्याने होऊ घातलेल्या १८ गावांच्या नगरपरिषदेच्या माध्यमातून येथे विकास होणार नाही.७) उत्पन्नाचे स्त्रोत असलेले ९ गाव वगळल्याने नगरपरिषदेसाठी उत्पन्न कुठून येणार याचा विचार न करता फक्त कंडोमपा ला फायदा कसा होईल याची काळजी घेतली गेली आहे.८) २७ गावांच्या नगरपालिकेची मागणी करतानाच या गावांच्या हद्दीत येणाऱ्या MIDC च्या माध्यमातून उत्पन्न मिळेल हे गृहीत धरले होते.९) प्रभाग क्रमांक १२१ मधील ( काटई,घारिवली,संदप व उसरघर ) गावे कंडोमपा मध्ये कोणत्या आधार घेतली ?१०) जर कंडोमपा मध्ये समाविष्ट केलेली गावे त्यांच्या महसुली हद्दी प्रमाणे घेतली आहेत तर मग काटई व उसरघर गावाच्या महसुली हद्दीत असलेला पलावा संकुलातील भाग कोणत्या आधारावर सोडला ?११) ९ गावे कंडोमपा मध्ये घेताना त्या गावांमध्ये जास्त प्रमाणात नागरीकरण झाले आहे हा मुद्दा घेतला आहे. खरंतर काटई,घारिवली,संदप व उसरघर या ४ गावांमध्ये कोणतेही नागरीकरण झाले नाही, तसेच इतर ५ गावांमध्ये झालेले नागरीकरण हे कारण ही गावे न वगळण्यासाठी पुरेसे आहे का?

अशाप्रकारे २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका बनवावी अशी मागणी असतानाही, सर्व बाबतीत अनुकूल परिस्थिती असूनही असा ९ गाव वगळण्याचा निर्णय घेतल्याने सर्व नागरिकांमध्ये आज नाराजी पसरली आहे. तरी आपण या बाबत तातडीने निर्णय घेऊन २७ गावांमधील ९ गाव वगळून १८ गावांची नगरपरिषद न बनविता, सर्व २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका बनविण्याबतचा फेरविचार प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, ही विनंती.

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलkalyanकल्याणdombivaliडोंबिवली