भिवंडी : काम न करता दारू पिऊन घरी आलेल्या पतीला जाब विचारणा-या पत्नीला जाळण्याचा प्रयत्न केला. यात ती गंभीर भाजली असून तिला सिव्हील रूग्णालयात दाखल केले आहे.अश्विनी मगर (२४) असे जखमी महिलेचे नाव आहे. ती घरी असताना तिचा नवरा अमोल हा दारू पिऊन आला. त्याला कामावर न गेल्या प्रकरणी जाब विचारला असता त्याला राग आला. त्याने शिविगाळ करत तिला मारहाण केली. ती घरात रडत बसलेली असताना त्याने तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवले. या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.
कामावर न गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला जाळण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 01:53 IST