शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

माथेरानमध्ये घोड्यांच्या संख्येला ‘लगाम’? हरित लवादाच्या सुनावणीकडे लक्ष त्रिसदस्यीय समितीने केली होती पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 07:00 IST

माथेरान हे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र आहे. त्यामुळे येथे इंधनावर चालणाऱ्या वाहनांना बंदी आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कमाथेरान : संवेदनशील माथेरानमध्ये वाहतुकीसाठी ४६० घोडे व मालवाहतुकीसाठी ३०० ते ३५० घोडे सेवेत आहेत. घोड्यांची संख्या वाढल्याने तीन टन लीद जमा होत असते. त्याची विल्हेवाट लावण्याची कोणतीही यंत्रणा पालिकेकडे नाही. येथील पर्यावरण धोक्यात आले आहे. याबाबत हरित लवादाकडे याचिका दाखल केली होती. त्रिसदस्यीय समितीने ३ दिवसांपूर्वी पाहणी केली. 

ही समिती आपला अहवाल हरित लवादाकडे सादर करणार असून याप्रकरणी २३ डिसेंबरला होणाऱ्या सुनावणीत लवाद कोणता निर्णय घेणार याकडे येथील अश्वचालकांचे लक्ष आहे.  माथेरान हे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र आहे. त्यामुळे येथे इंधनावर चालणाऱ्या वाहनांना बंदी आहे. 

दळणवळणाचे साधन म्हणून येथे घोडा व हात रिक्षाचा वापर केला जातो. अलीकडे ई-रिक्षा सुरू करण्यात आल्या आहेत. येथे प्रवासी वाहतुकीसाठी सध्या ४६० घोडे व मालवाहतुकीसाठी ३०० ते ३५० घोडे सेवेत आहेत. मात्र, त्या तुलनेत ६६ तबेले आहेत. घोड्यांच्या जमा होणाऱ्या लीदची विल्हेवाट लावण्याची नगरपालिकेकडे कोणतीही यंत्रणा नाही. 

परिणामी पर्यावरणावर याचा परिणाम होत आहे. ही समस्या मांडणारी याचिका सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे व केतन रमाणे यांनी पुणे येथील राष्ट्रीय हरित लवादाकडे केली होती. यावर २५ ऑक्टोबर रोजी सुनावणी झाली. यात हरित लवादाचे न्यायाधीश शिओ कुमार सिंग व पर्यावरणतज्ज्ञ डॉ. विजय कुलकर्णी यांनी तीनसदस्यीय समिती गठित करून माथेरानची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. 

या ठिकाणी केली पाहणीपर्यावरण विभागाचे डॉ. थुरू (शास्त्रज्ञ श्रेणी), प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ऋतुजा भालेराव, माथेरान पालिकेच्या अधिकारी यांनी सोबत शरलोट लेक, दस्तुरी नाका येथील बोरीचे मैदान व सिम्पसन टँक व इतर परिसराची पाहणी केली. 

‘त्या’ निर्णयाची पुनरावृत्ती होणार? हिमाचल प्रदेश येथील कुफ्री येथेही हीच समस्या होती. याबाबत हरित लवादाने अश्वचालकांचे पुनर्वसन करून घोड्यांची संख्या कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे. त्यामुळे माथेरानमध्येही हा निर्णय लागू होणार का, अशीही चर्चा सुरू आहे.

टॅग्स :Matheranमाथेरान