शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

पुनर्वसनाच्या बाता हवेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 00:34 IST

ठाकुर्ली परिसरातील मातृकृपा इमारत दुर्घटनेला शुक्रवारी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, अजूनही या दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या वारसांना तसेच बेघर झालेल्या रहिवाशांना अद्यापही न्याय न मिळाल्याने त्यांच्या पदरी उपेक्षा कायम राहिली आहे.

डोंबिवली : ठाकुर्ली परिसरातील मातृकृपा इमारत दुर्घटनेला शुक्रवारी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, अजूनही या दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या वारसांना तसेच बेघर झालेल्या रहिवाशांना अद्यापही न्याय न मिळाल्याने त्यांच्या पदरी उपेक्षा कायम राहिली आहे. इमारत दुर्घटनेनंतर राजकीय नेते, पुढाºयांकडून भल्या मोठ्या घोषणा झाल्या, पुनर्वसनाच्या बाता झाल्या, पण काही दिवस सरताच त्या विस्मृतीत गेल्याचे स्पष्ट होत आहे.ठाकुर्लीतील नीरानगर परिसरातील मातृकृपा इमारत २८ जुलै २०१५ ला रात्री १०.१५ च्या सुमारास कोसळली होती. या दुर्घटनेत ९ जणांचा बळी, तर १२ जणांना जायबंदी व्हावे लागले होते. ही दोन मजल्यांची इमारत रामदास पाटील यांच्या मालकीची होती. १९७१-७२ दरम्यान लोडबेअरिंग पद्धतीचा वापर करून दोन टप्प्यांत बांधलेल्या या इमारतीला दीड वर्षापूर्वी महापालिकेने धोकादायक इमारत म्हणून घोषित केले होते. या इमारतीचा एक भाग पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला. या इमारतीत १८ कुटुंबीय राहत होते. यात काही पागडी पद्धतीने, तर काही भाडेतत्त्वावर राहत होते. ही इमारत कोसळल्यानंतर कल्याण-डोंबिवलीतील बेकायदा तसेच धोकादायक इमारतींमधील रहिवाशांच्या सुरक्षा व पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर आला.कल्याण, डोंबिवली, ठाकुर्ली या पट्ट्यातील अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाºया रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे संकेत महापालिकेचे तत्कालीन आयुक्त ई. रवींद्रन यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या धर्तीवर कल्याण-डोंबिवली शहरामध्येही समूह पुनर्विकास योजना (क्लस्टर डेव्हलपमेंट) राबवली जाण्याची चर्चा सुरू झाली खरी, परंतु कालांतराने तीही केवळ चर्चाच राहिली.दरम्यान, या दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांना पाच लाखांच्या मदतीची मागणी विधानसभेतील विरोधीपक्षनेते राधाकृष्ण पाटील यांनी केली होती. पण, त्याचीही दखल सरकारने अद्याप घेतली नाही. दुर्घटनेनंतर झालेल्या केडीएमसीच्या निवडणुकीत बहिष्कार घालण्याचा पवित्रा मृतांच्या कुटुंबीयांनी आणि बेघर झालेल्या रहिवाशांनी घेताच तातडीने एक लाखाचा धनादेश त्यांना सुपूर्द करण्यात आला. इमारतीचा मालक रामदास पाटील याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांनी अटक केली. नंतर त्याची जामिनावर सुटकाही झाली. पण, अद्यापपर्यंत जागेचा तिढा कायम राहिल्याने ती जागा सध्या मोकळीच आहे. रहिवाशांना इतरत्र भाड्याने किंवा नातेवाइकांकडे आसरा घ्यावा लागला आहे. मध्यंतरी एका बिल्डरच्या माध्यमातून रहिवाशांना घरे देण्याचा निर्णय झाला होता. परंतु, तोही कालांतराने मागे पडला.निवाºयाचा प्रश्न ‘जैसे थे’या दुर्घटनेत सुदैवाने बचावलो, पण निवाºयाचा प्रश्न ‘जैसे थे’ राहिल्याचे रहिवासी श्रीनिवास सावंत यांनी सांगितले. मृत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाइकांना तुटपुंजी मदत मिळाली असताना ज्यांच्या घरातील सामानाचे नुकसान झाले, त्याची अद्याप भरपाई मिळालेली नाही. मालकाकडे डिपॉझिटची रक्कम मागितली होती. पण, ते द्यायला तयार नाहीत. सध्या कचोरेमधील एका चाळीत रूम घेतली असून तेथे भाड्याने राहत असल्याचे सावंत यांनी सांगितले.२८ जुलैची रात्र आमच्यासाठी काळरात्र ठरली. ती रात्र आठवली की, आजही काळजात धस्स होते. दोन वर्षांपूर्वी पडलेल्या धोकादायक ‘मातृकृपा’ इमारतीत आम्ही आमची आई गमावली, आम्ही दोघे भाऊ पोरके झालो. पण, आजच्याघडीला आमची परवड कायम आहे.दुर्घटनेनंतर आठवडाभर संक्रमण शिबिरात काढल्यानंतर जीव बचावलेल्या रहिवाशांना आपल्या निवासाची सोय स्वत: करावी लागल्याचे रवींद्र रेडीज ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले.राज्य सरकारने मदतीचे आश्वासन दिले, पण आजतागायत ते पूर्ण केले नाही. दुर्घटनेनंतर सात महिन्यांनी तहसीलदारांनी मृतांच्या कु टुंबीयांना लाखाचा धनादेश दिला, पण आजही आम्ही घराच्या शोधात आहोत. तूर्तास मित्राकडे सहारा घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.