शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
3
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
4
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
5
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
6
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
7
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
8
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
9
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
10
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
11
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
12
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
13
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
14
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
15
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
16
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
17
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
18
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
19
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
20
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?

गावदेवी मैदान पूर्ववत करा,अन्यथा भूमिगत पार्किंग सुरु होऊ देणार नाही; भाजपचा इशारा

By अजित मांडके | Updated: November 8, 2022 15:43 IST

गावदेवी भूमिगत पार्कीगचे काम आणि येथील मैदानाचे कामही अंतिम टप्यात आले असल्याचा दावा पालिकेने केला आहे.

अजित मांडके (ठाणे)ठाणे : स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून महत्वाकांक्षी असलेला गावदेवी भूमिगत पार्किंगचे काम आणि येथील मैदानाचे कामही अंतिम टप्यात आले असल्याचा दावा पालिकेने केला आहे. मात्र पूर्वीपेक्षा मैदानाचा आकार लहान झाला असून दीड वर्षे उलटूनही हे मैदान किंवा पार्किंग अद्यापही ठाणेकरांसाठी खुले झालेले नाही. त्यातही कामला उशिर केला म्हणून ठेकेदारावर कोणत्याही स्वरुपाची कारवाई अद्याप पालिकेने केलेली नाही. त्यामुळे आधी गावदेवी मैदान पूर्वी जसे होते, तसे पूर्ववत करुन ते नागरिकांसाठी खुले करा अशी मागणी भाजपच्या महिला ठाणे शहर अध्यक्षा मृणाल पेंडसे यांनी केली. मात्र मैदान खुले झाली नाही तर भूमीगत पार्किंगदेखील सुरु होऊ देणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.

मंगळवारी मृणाल पेंडसे यांच्यासह, माजी नगरसेविका प्रतिभा मढवी आणि सुनेश जोशी यांनी भूमिगत पार्कीग प्लाझा आणि मैदानाची पाहणी केली. यावेळी त्यांनी हा इशारा दिला. ७०० चौरस मीटरवर भुमीगत पार्कीगचे हे बांधकाम करण्यात आले आहे. याठिकाणी १३० चार चाकी आणि १२० दुचाकी पार्क करता येणार आहेत.  यासाठी २७ कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे. एकीकडे भूमिगत पार्कीगची सुविधा उपलब्ध करुन दिली जात असतांना दुसरीकडे आता येथील मैदानही पूर्वीप्रमाणे क्रीडा प्रेमींसाठी खुले केले जाणार असल्याचा दावा पालिकेने केला होता. परंतु २७ कोटी खर्च करुनही या पार्किंगचे किंवा मैदानाचे कामही अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यात दीड वर्षापूर्वी पार्कीग व मैदान खुले होणे अपेक्षित परंतु अद्यापही ते पूर्ण झालेले नाही. त्यात ठेकेदारावर पेनल्टी लावणे अपेक्षित असतांना त्याला कामाच्या मोबदल्यात ९० टक्के पेमेंट अदा करण्यात आल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला.पूर्वी जसे मैदान होते, तसेच मैदान उपलब्ध करुन दिले जाईल असे पालिकेने सांगितले होते. मात्र प्रत्यक्षात मैदानाचा आकार हा पूर्वीपेक्षा कमी झाला असून ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करावी अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे करणार असल्याचे पेंडसे यांनी सांगितले. मात्र जो पर्यंत येथील मैदान नागरीकांसाठी खुले होत नाही, तो पर्यंत पार्किंग सेवा देखील सुरु करु दिले जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी पालिका प्रशासनाला दिला आहे.

टॅग्स :thaneठाणे