शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

झोपड्यांच्या सर्वेक्षणाची जबाबदारी एसआरएवर; पालिकेला अपयश आल्याने घेतला निर्णय, बायोमेट्रीक पद्धतीने होणार नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 04:38 IST

ठाणे महापालिका हद्दीतील झोपडपट्ट्यांच्या बायोमेट्रीक सर्वेक्षणाचा पालिकेचा प्रयत्न फसला असताना आता नव्याने एसआरएच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मुंबईतील सर्वेक्षणाच्या धर्तीवर प्रत्यक्ष घरोघरी जाऊन ही सर्वेक्षण प्रक्रि या करण्याचे एसआरएने निश्चित केले आहे.

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीतील झोपडपट्ट्यांच्या बायोमेट्रीक सर्वेक्षणाचा पालिकेचा प्रयत्न फसला असताना आता नव्याने एसआरएच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मुंबईतील सर्वेक्षणाच्या धर्तीवर प्रत्यक्ष घरोघरी जाऊन ही सर्वेक्षण प्रक्रि या करण्याचे एसआरएने निश्चित केले आहे. त्यानुसार, येत्या १ डिसेंबरपासून ते सुरू होणार असून या प्रक्रि येत संपूर्ण पारदर्शकता बाळगून प्रत्यक्ष लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळवून देणार असल्याचा दावा महामंडळाने केला आहे.ठाणे शहराला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी नागपूर आणि पुणे शहरांच्या धर्तीवर २०१५ मध्ये एसआरए योजना ठाण्यामध्ये आणण्यात आली. या योजनेंतर्गत ठाण्यात ९४ प्रकल्प राबवण्याचे निश्चित करण्यात आले. परंतु, त्यासाठी अचूक माहिती घेणे आवश्यक होते. यासाठीच आता महामंडळाने मुंबईसारखेच ठाण्यातही घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईमध्ये दीड वर्षापूर्वी हे सर्वेक्षण सुरू झाले आहे. त्याच पद्धतीने हे हायटेक सर्वेक्षण ठाण्यामध्ये १ डिसेंबरपासून सुरू होणार असून ते सहा महिन्यांत पूर्ण होणार आहे. लीडर (लाइट डिटेक्शन अ‍ॅण्ड रेजिंग मशीन) ही हायटेक प्रणाली वापरून हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यामध्ये, प्रत्येक झोपडीचे छायाचित्र ३६० अंशांनी काढता येणार असून शहराच्या नकाशावर ते समाविष्ट करता येणार आहे. एसआरएचे सदस्य प्रत्येक झोपडीत प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणचे छायाचित्रण करतील. कुटुंबप्रमुखाचे नाव, सदस्यांची माहिती आणि आधार किंवा पॅनकार्डसारखे दाखले नोंद करतील. त्यानंतर, ही सर्व माहिती समाविष्ट करून घेण्यात येणार आहे. झोपडीचे मोजमाप करून आसपासच्या परिसराचेसुद्धा चित्रीकरण करण्यात येणार असल्याची माहिती एसआरएच्या अधिकाºयांनी दिली.हे सर्वेक्षण करण्यासाठी तीन संस्थांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक झोपडीचे योग्य मोजमाप करून त्या जागेच्या सीमारेषा ठरवण्यात येतील आणि ही सर्व माहिती नोंदणीकृत करण्यात येणार आहे. ज्यामुळे प्रत्येकाला या योजनेचा लाभ घेता येईल. या उच्च तंत्रज्ञ पद्धतीमुळे कोणत्याही वादाचे कारण शिल्लक राहणार नसल्याचा दावाही करण्यात येत आहे.आजवर सर्वेक्षण हे फक्त लोकसंख्येच्या धर्तीवर अवलंबून होते. मात्र, आता प्रत्यक्षात दारोदारी जाऊन सर्वेक्षण केल्यामुळे त्याला ठोस मजबुती असेल, असा दावा महामंडळाने केला आहे. बीएसयूपी योजनेसाठी महापालिकेने बायोमेट्रीक सर्वेक्षणाची सुरु वात केली होती. मात्र, या प्रक्रि येत अनेक अनियमितता आढळल्याने हे सर्वेक्षण रद्द ठरवण्यात आले. ठाण्यात एसआरएअंतर्गत ९४ प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यापैकी सद्य:स्थितीत २७ प्रकल्प हे अद्याप प्राथमिक अवस्थेत आहेत, तर ६७ प्रकल्पांवर काम सुरू आहे. या ६७ प्रकल्पांपैकी ३५ प्रकल्प पूर्ण झाले आहेत. याच ३५ प्रकल्पांमध्ये एसआरडीअंतर्गत करण्यात आलेल्या १७ प्रकल्पांचासुद्धा समावेश आहे. हे १७ प्रकल्पसुद्धा कालांतराने एसआरए प्रकल्पात वर्ग करण्यात आले होते. ठाण्यात १५,००० कुटुंबांना अद्यापपर्यंत या प्रकल्पाचा लाभ झालेला आहे. पूर्ण झालेले ३५ प्रकल्प हे शहरातील मध्यवर्ती भागातील आहेत.सर्वेक्षणाचे हे आहेत फायदेझोपडपट्टीचे संपूर्ण संकलन एकाच ठिकाणी, एसआरए योजना लाभार्थ्यांची ओळख, पारदर्शकता आणि भ्रष्टाचाराला आळा, अनेक ठिकाणी असणाºया वादांमुळे रखडलेले प्रकल्प मार्गी लागतील, सर्व झोपड्यांचे नकाशे तयार होतील आणि अनधिकृत झोपड्यांचे बिंग सहज फुटेल, असे काही फायदे आहेत.ठाण्यातील १८ लाख लोकसंख्येतील तब्बल ५४ टक्के लोक हे झोपडपट्टीत राहतात. शहरात २२७ झोपडपट्ट्या असून तब्बल २.३२ लाख घरे आहेत. तर, ९ लाख लोक त्या ठिकाणी वास्तव्य करत आहेत. बीएसयूपी आणि एसआरडीअंतर्गत महापालिकेने काही घरे बांधली, मात्र अद्यापही २ लाख घरांची मागणी कायम आहे.नौपाडा, पाचपाखाडी, कोपरी यासारख्या परिसरात हे प्रकल्प लवकर पूर्ण झाले. कळवा, मुंब्रा, घोडबंदर यासारख्या कमी दर असणाºया परिसराकडे विकासक आकृष्ट होत नसल्याने या ठिकाणचे प्रकल्प वेळेवर पूर्ण होऊ शकत नसल्याचा दावा महामंडळ करत आहे. ठाणे शहरातील घरांना पुनर्विक्रीसाठी मागणी आहे.

टॅग्स :thaneठाणे