शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

स्वच्छ शहराची जबाबदारी सर्वांचीच, महापौरांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 00:42 IST

ठाणे शहरात स्वच्छता अभियान व्यापक प्रमाणात राबविण्यात येत आहे. शहर स्वच्छ, सुंदर ठेवण्याची जबाबदारी केवळ सफाई कामगारांची नसून ती प्रत्येक नागरिकाची आहे.

ठाणे : ठाणे शहरात स्वच्छता अभियान व्यापक प्रमाणात राबविण्यात येत आहे. शहर स्वच्छ, सुंदर ठेवण्याची जबाबदारी केवळ सफाई कामगारांची नसून ती प्रत्येक नागरिकाची आहे. स्वच्छता ही नैतिक जबाबदारी मानून काम केल्यास निश्चितच शहराचा कायापालट होईल, असे प्रतिपादन महापौर नरेश म्हस्के यांनी शुक्रवारी केले.ठाणे महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण २०२० या मोहिमेंतर्गत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याकरिता तयार केलेल्या रॅप गीताच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी ठाणे शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याची शपथ घेतली.यावेळी उपमहापौर पल्लवी कदम, भाजप गटनेते नारायण पवार, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर, उपायुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी, प्रसिद्ध अभिनेते मंगेश देसाई, प्रसिद्ध संगीतकार चिनार-महेश, आरोग्य अधिकारी बालाजी हळदेकर, सहायक आयुक्त शंकर पाटोळे आदी उपस्थित होते. ठाणे शहराची यशोगाथा सांगणाºया ठाणे गौरव या गीताचे गीतकार उपायुक्त संदीप माळवी यांनी ठाणे आपले चमकू दे, हे गीत लिहिले आहे. टाइमपास, टाइमपास २, शर्यत, अशा चित्रपटांचे संगीतकार चिनार-महेश या आघाडीच्या जोडीने या गीताला संगीत दिले आहे.सध्या तरु णांमध्ये रॅप गीताला प्रथम पसंती असून स्वच्छतेबाबतच ठाणे आपले चमकू दे हे गीत सर्वांना आवडेल असेच आहे. शहरातील चित्रपटगृहे, मॉल्स, सार्वजनिक महत्त्वाची ठिकाणी, घंटागाडी येथे हे गीत वाजविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.ठाणे होणार प्लास्टिकमुक्तशहराला स्वच्छ ठेवण्याचे आवाहन आपले सर्वांचे आहे ते आपण सर्वांनी समर्थपणे पेलले पाहिजे. सफाई कर्मचाऱ्यांपेक्षा शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही आपली आहे, असेही त्यांनी सांगितले.स्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत शहरात परिसर स्वच्छता, ओला-सुका कचरा वर्गीकरण, प्लास्टिकबंदी, हगणदारीमुक्त शहर असे विविध उपक्र म राबविण्यात येत असून याबाबत नागरिकांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे.रॅप गीतासोबतच शहरात प्लास्टिक वापर टाळा, स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे आदी संदेश देणारे फलक लावण्यात आले आहेत. नागरिकांनी एकदाच वापर करून फेकून देणाºया प्लास्टिकचा वापर बंद करावा. ठाणे शहर प्लास्टिक मुक्त करावे. कापडी पिशव्यांचा वापर करावा. स्वच्छता हे दैनंदिन कामापुरती मर्यादित न ठेवता स्वच्छतेची चळवळ ही मोठ्या प्रमाणात नागरिकांपर्यंत पोहोचली पाहिजे, याकरिता ठाणे महापालिकेच्या वतीने व्यापक प्रमाणात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे