शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

डोंबिवलीच्या ग्रामीण भागात ठणठणाट, महापालिका प्रशासनावर रहिवाशांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 03:47 IST

डोंबिवली : गावे महापालिकेत आणि पाणीपुरवठा मात्र एमआयडीसीकडून, अशा कात्रीत सापडलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांतील पाणीटंचाई संपण्याची चिन्हे नाहीत.

अनिकेत घमंडी डोंबिवली : गावे महापालिकेत आणि पाणीपुरवठा मात्र एमआयडीसीकडून, अशा कात्रीत सापडलेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांतील पाणीटंचाई संपण्याची चिन्हे नाहीत. दररोज शेकडो टँकरने येथे पाणीपुरवठा केला जातो. यंदा तर ऐन दिवाळीत अभ्यंगस्नानासाठीही टँकर मागवाण्याची वेळ आली. पालिकेने पाण्याच्या जुन्या वाहिन्या बदलण्याचे काम हाती घेतले आहे, पण त्यातही फारशी प्रगती नसल्याने उन्हाळ्यात परिस्थिती किती भीषण होईल, या कल्पनेने त्यांना घाम फुटला आहे.ऐन दिवाळीत तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला. पाण्याअभावी सणासुदीला नातेवाइकही येत नाहीत. आयुष्याची पुंजी गोळा करून या भागात घर घेतले खरे, पण ते घेतले नसते तर बरे झाले असते, अशा शब्दांत नांदिवली-पंचानंद येथील रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली.मंत्रालयात पाणीपुरवठा मंत्र्यांकडे, जिल्ह्यात पालकमंत्र्यांकडे केवळ बैठका होतात. लोकप्रतिनिधी येतात, पाहणी करतात. पण, आमचे नळ मात्र कोरडे ठणाणा. पाणी मिळणार अशा घोषणा ऐकायच्या. पण, सोसायट्यांच्या टाक्यांमध्य २०० लीटरही पाणी येत नाही. किती वर्षे आम्ही पाण्यावाचून राहायचे आणि का, असा प्रश्न रहिवाशांनी केला.महापालिकेचे ८० टँकर केवळ भोपर, नांदिवली पंचानंद भागात येतात. यावरून अन्य २५ गावांमधील पाण्याची अवस्था किती भयंकर आहे, याचा अंदाज येतो. महापालिकेचे अधिकारी प्रत्यक्ष ठिकाणची पाहणी का करत नाहीत. पाण्याची कोणती लाइन सुरू आहे तसेच चढउतारामुळे पाण्याचा होणारा असमान पुरवठा, याबाबत काहीच पाहिले जात नाही. पाण्याच्या कुठेही व कशाही जोडण्या दिल्या जात असल्याने समस्या तीव्र आहे, असे रहिवाशांनी सांगितले.>नांदिवली-पंचानंदमधील टंचाईग्रस्त इमारती आणि चाळीबाप्पा मोर्या, लहूस्मृती चाळ, बामनदेव कृपा चाळ, ताई निवास, गणराज पार्क, पद्मिनी प्लाझा, पुंडलिक म्हात्रे अपार्टमेंट, शांताराम दर्शन, ताज पॅलेस, शांती सदन, समर्थ मराठा, जय मल्हार, कृष्णा दर्शन, बामनदेव कृपा, कृष्णगंगा, गुलमोहर, नवश्री संकल्प, महालक्ष्मी छाया, गावदेवी, काळुबाई निवास, मे फ्लॉवर, गणराज पार्क, सुरेश अपार्टमेंट, नामदेवी लीला, कृष्ण दर्शन, सीताराम निवास, कृष्ण गंगा सोसायटी, श्लोक अपार्टमेंट, टष्ट्वीन व्हीला.मंत्रालयातील बैठकीत ठरल्याप्रमाणे एमआयडीसीने दोन आठ इंच व्यासाचे कनेक्शन देण्याचे ठरले. त्याची पूर्तता एमआयडीसीने केली. त्यास दोन महिने झाले, पण अद्यापही महापालिकेने ते कनेक्शन नवीन लाइन टाकून काही अंतरावरील जुन्या लाइनमध्ये बुस्ट करायचे होते, पण ते केलेले नाही. आयुक्तांना २३ आॅक्टोबरला पत्र दिले आहे, पण त्याचे अद्याप काहीही उत्तर नाही.- प्रकाश म्हात्रे, माजी जिल्हा परिषद सदस्यआमच्या सोसायटीत ४४ सदस्य आहेत. एक टँकर दोन दिवस कसा पुरणार. जेमतेम ५ ते ६ बादल्या भरतात. कसे व्हायचे. नगरसेविकेला तरी किती आणि काय सांगणार? पाणीसमस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे.- रोहिणी भोईर,मे फ्लॉवर सोसायटीदोन दिवसाआड टँकर येतो. त्यासाठी १०० रुपये मोजावे लागतात. पण, नऊ जणांना ते पाणी अजिबात पुरत नाही. आणखी किती काळ हे सहन करावे लागणार, कुणास ठाऊक?- पुष्पा चौधरी,समर्थ मराठा सोसायटीएक वर्ष झाले. घरच्या सोडाच पण इमारतीच्या टाकीतील पाण्याच्या नळाला थेंब नाही. आमच्या इमारतीतील २६ सदनिकाधारकांना पिण्याचे पाणी पुरवताना नाकीनऊ येते.- सुशीला नील, कृष्णगंगा सोसायटीचार वर्षांपासून पाणीसमस्या भेडसावत आहे. आता तर अजिबात पाणी मिळत नाही. किती अर्ज करायचे आणि काय करायचे?- किरण जाधव, श्लोक अपार्टमेंटटँकरशिवाय पर्यायच नाही. एक दिवसाआड प्रकाश म्हात्रे यांना फोन करायचा, टँकर मागवून घ्यायचा, हे सुरूच आहे.- नीता पाटील, गणराज पार्क

टॅग्स :dombivaliडोंबिवली