शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

गुणपत्रिका देण्यास मुख्याध्यापकांचा विरोध, बदलापूरची घटना, विद्यार्थी, पालकांमध्ये संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 01:25 IST

एस.डी.एम. इंग्रजी शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका आणि शाळेचा दाखला देण्यास मुख्याध्यापकांनी विरोध केल्याने शाळेतील वातावरण तंग झाले.

बदलापूर  - बदलापूरमधील एस.डी.एम. इंग्रजी शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका आणि शाळेचा दाखला देण्यास मुख्याध्यापकांनी विरोध केल्याने शाळेतील वातावरण तंग झाले होते. सर्व विद्यार्थी आणि त्यांचे पालक शाळेवर संतापले होते. शाळा प्रशासन गुणपत्रिकेच्या मोबदल्यात पैशांची मागणी करत असल्याने हा प्रकार घडला होता. अखेर, पालकांच्या संतापानंतर प्रशासनाने गुणपत्रिका देण्याचे मान्य केले.दहावीचा निकाल लागून दोन आठवडे उलटूनही शाळा गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखला दिला जात नाही. परिणामी, विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशासाठी अडचणी निर्माण होत आहेत. दरम्यान, याच शाळेत अकरावी करत प्रवेश घ्या, अशी सक्ती मुख्याध्यापक करत असून त्याकरिता गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखला देण्यास नकार दिला जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. याचाच जाब विचारत पालक आणि विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांना धारेवर धरले. सोमवारी विद्यार्थ्यांना गुणपत्रिका दिल्या जातील, असे आश्वासन दिले आहे. मात्र, असे न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना नगसेवक शैलेश वडनेरे यांनी दिला आहे.आधीच प्रवेश प्रक्रियेवरून गोंधळ सुरू असताना त्यात शाळेने अशा प्रकारे अडवणूक केल्यामुळे विद्याथी, पालकांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. शाळा सोडल्याचा दाखला आणि गुणपत्रिका मिळत नसल्याने विद्यार्थी धास्तावून गेले होते. प्रवेशाच्यावेळी आवश्यक कागपत्रांमध्ये या दोन गोष्टी लागत असल्याने शाळा या कागदपत्रांची अडवणूक करत असल्याबद्दल पालकांनी संताप व्यक्त केला.राज्य सरकार आणि शिक्षण खात्याने अशा प्रकारच्या शाळांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. म्हणजे अन्य कुठल्या शाळा अशा प्रकारचे धाडस करणार नाही असे संतप्त झालेले विद्यार्थी, पालकांनी यावेळी बोलून दाखवले.

टॅग्स :Schoolशाळा