शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

डोंबिवलीत मालमत्ताकराची अव्वाच्या सव्वा बिले, दडपशाहीविरोधात एमआयडीसी परिसरातील रहिवाशांचा ठराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 22:28 IST

केडीएमसीमध्ये समाविष्ट झाल्यानंतर एमआयडीसी परिसरातील रहिवाशांना पाठवलेल्या मालमत्ता कराची बिले पाहून त्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

डोंबिवली - केडीएमसीमध्ये समाविष्ट झाल्यानंतर एमआयडीसी परिसरातील रहिवाशांना पाठवलेल्या मालमत्ता कराची बिले पाहून त्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पूर्वीच्या बिलांच्या तुलनेत पाच ते आठ पट जास्त बिले आल्याने रहिवाशांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. महापालिकेची ही दडपशाही सहन करणार नाही असे सांगत रविवारी झालेल्या डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनच्या बैठकीत त्याविरोधात ठराव केला आहे.बैठकीला सुमारे १५० रहिवासी उपस्थित असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष विवेक देशपांडे यांनी दिली. ते म्हणाले की, मुळात ही बिले खूपच उशिराने पाठवलेली आहेत. त्यात नमूद केलेली रक्कम ही अवाजवी असून ती भरणे अशक्य आहे. त्यामुळे ही बिले योग्य प्रमाणात कमी करून दिल्यास तात्काळ भरण्यासाठी संस्था पुढाकार घेईल, असेही ते म्हणाले. महापालिकेने पाठवलेली बिले ही अन्यायकारक आहेत. रहिवाशांमध्ये एकजूट असून त्यांना फसवण्याचा कुणीही प्रयत्न करू नये, असेही ते म्हणाले.आयुक्त गोविंद बोडके, स्थायी समितीचे सभापती दीपेश म्हात्रे यांच्याकडे याबाबत पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. तसेच राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार सुभाष भोईर यांची भेट घेऊ न हा अन्याय दूर करण्यासाठी साकडे घालण्यात येईल. तोंडी आश्वासन नको!भरमसाट आलेली बिले कमी करण्याबाबत महापालिका कर्मचारी तोंडी सांगत आहेत; मात्र त्याबाबत लेखी देण्याबात ते तयार नाहीत. ही गंभीर बाब असल्याचे आयुक्त बोडके यांच्या लक्षात आणून देण्यात येणार आहे, असे देशपांडे यांनी सांगितले. त्यावेळी सचिव राजू नलावडे, उपाध्यक्ष साई प्रसाद, सहकार्यवाह वर्षा महाडिक आदींसह संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते रहिवासी उपस्थित होते.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीkdmcकल्याण डोंबिवली महापालिका