शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पूर्वसूचना न देता केल्या जाणाऱ्या भूसंपादनामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 05:12 IST

मुंबई-बडोदा राष्ट्रीय महामार्ग : नितीन गडकरी यांच्याकडे दाद मागणार

ठाणे : मुंबई-बडोदा राष्ट्रीय महामार्गासाठी बदलापूर परिसरात शेतजमीन संपादनास प्रारंभ होत आहे. मात्र, त्यासाठी बाधित शेतकºयांना जमीन अधिग्रहणाच्या पूर्वसूचना अद्यापही मिळाल्या नसल्याचा आरोप शेतकºयांकडून होत आहे. त्यास विचारात न घेताच भूमापन विभाग आणि राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अधिकारी शेतजमिनीचे मोजमाप करत असल्यामुळे शेतकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. याविरोधात संतापलेले शेतकरी लवकरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे दाद मागण्याच्या तयारीत आहेत.

केंद्र सरकारच्या महत्त्वकांशी प्रकल्पांपैकी एक असलेल्या मुंबई-बडोदा राष्ट्रीय महामार्गासाठी अंबरनाथ तालुक्यातील बदलापूर, चामटोली, दहिवली या गावांतील शेतकºयांच्या शेतजमिनींचे मोजमाप प्रशासनाकडून होत आहे. ज्या शेतकºयांना मोजणीच्या नोटिसा दिलेल्या आहेत, त्यांच्या जमिनीचे मोजमाप केले जात नसल्याचा आरोप संबंधित संतप्त शेतकºयांकडून होत आहे. मात्र, ज्यांना मोजणीच्या नोटिसा दिलेल्या नाहीत, त्यांच्या जमिनींचे मोजमाप केले जात असल्याचा आरोप संबंधित शेतकरी करत आहे. या मनमानीमुळे चामटोलीतील माजी सरपंच मोहन कोंडीलकर, सचिन जाधव, सदाशिव पाटील, गजानन भिडे, संतोष हिरमाळी, हरीश भाई आणि भोपी आदी शेतकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या या मनमानीविरोधात शेतजमिनीचे संपादन करणारे अभियंता मिलिंद देशमुख आणि भूमापन अधिकारी मोरे यांना संबंधित शेतकºयांकडून जाब विचारला जात आहे. जमीन मोजमापाची पूर्वसूचना देणारी नोटीस मिळाल्याशिवाय मोजणी होऊ देणार नसल्याचा पवित्रा या शेतकºयांनी घेतला आहे. यातून शाब्दिक चकमकी उडत आहेत. त्यास आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागत असल्याचे वास्तव संबंधित बाधित शेतकरी बाळाराम जाधव यांनी सांगितले.न्यायालयात जाता येऊ नये, म्हणून नोटीस नाहीशेतकºयांवर अन्याय करून या महामार्गासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाºयांकडून अन्यायकारी पद्धतीने शेतजमिनीचे संपादन केले जात आहे. ज्या शेतकºयांना नोटिसा दिल्या, त्यांच्या शेतजमिनीची मोजणी केली जात नाही. पण, ज्यांना नोटिसा दिलेल्या नाहीत, त्यांच्या शेतजमिनीची मोजणी केली जात आहे, असे या अधिकाºयांच्या मनमानीला बळी पडलेले बाधित शेतकरी जाधव यांनी निदर्शनात आणून दिले आहे. शेतकºयांनी न्यायालयात धाव घेऊ नये, म्हणून पूर्वसूचनेच्या नोटिसा न देता जमिनींचे मोजमाप केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. याविरोधात गडकरी यांच्याकडे लेखी तक्रार करण्यासाठी शेतकरी लवकरच एकत्र येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले

टॅग्स :Farmerशेतकरी