शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

पक्षी अवरोधक नेटमध्ये अडकलेल्या 8 फुटांच्या अजगराला जीवदान; असं करण्यात आलं रेस्क्यू ऑपरेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 17:47 IST

Python Rescue : सर्प मित्र ज्ञानेश्वर शिरसाठ आणि चंद्रकांत कांगराळकर घटनास्थळी पोहोचताच, अडकलेला अजगर, ही मादी (Female) आहे, असे त्यांच्या लक्षात आले. ती जखमी होती. तिच्या जखमांना मेगोट्स झाले होते.

विशाल हळदे  -ठाणे- गेल्या महिनाभरापूर्वी येऊर येथील गोल्डन स्वानं क्लबयेथून सर्प मित्र ज्ञानेश्वर शिरसाठ आणि चंद्रकांत कांगराळकर यांना एक कॉल आला होता. यात, येथील पक्षी अवरोधक नेटमध्ये 7 ते 8 फुटाचा अजगर असल्याचे सांगण्यात आले होते. यानंतर, या सर्प मित्रांनी क्षणाचाही विलंब न करता, तेथे धाव घेत त्या अजगराला वाचविले होते. यानंतर आज त्या अजगराला सुखरूप येऊर जंगलात सोडण्यात आले आहे. (Python Rescue Operation)

सर्प मित्र ज्ञानेश्वर शिरसाठ आणि चंद्रकांत कांगराळकर घटनास्थळी पोहोचताच, अडकलेला अजगर, ही मादी (Female) आहे, असे त्यांच्या लक्षात आले. ती जखमी होती. तिच्या जखमांना मेगोट्स झाले होते, तिला रेस्क्यू करून सेंट्रल पेट वेट, वर्तकनगर, ठाणे शहर येथील प्राण्यांच्या दवाखान्यात नेण्यात आले. तेथे डॉक्टर किरण शेलार यांनी तिच्यावर उपचार केले. 

या अजगर बचावाच्या कामात वनविभागाचे आरएफओ गणेश सोनटक्के, वाईल्ड विभागाचे संदीप मोरे व राजन खरात यांचे सहकार्य लाभले. तसेच, जीवोहम चॅरिटेबल ट्रस्टमार्फत समाजसेवक अश्वजित गायकवाड ,चंद्रकांत कंगराळकर (जेष्ठ सर्पमित्र, ठाणे ), पोलीस नाईक प्राणीमित्र ज्ञानेश्वर शिरसाठ, सर्पमित्र निलेश सुतार यांनी त्या फिमेल अजगराला (जो शेड्यूल्ड -1 मध्ये मोडतो) आज सुखरूप येऊर जंगलात सोडले आहे. 

निसर्ग आणि मानव यांचा अतूट संबंध आहे, निसर्ग चक्रातील वनस्पती, वृक्ष, प्राणी या नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन व रक्षण करणे हे मानवाचे प्रथम कर्तव्य आहे, ही जैवविविधतेची साखळी अबाधीत ठेवून मानव व मूक प्राणी यांच्यात समन्वय घडून यावा यासाठी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे, जेणेकरून बिबटे, साप हे प्राणी मानवी वस्तीत येण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, त्यांच्या अधिवासात मानवाने शिरकाव केल्याने मानव व जंगली प्राणी यांच्यात होणारे द्वंद्व थांबले पाहीजे यासाठी जनजागृती करणे व इतर बचावात्मक अभियान राबविणे मह्त्वाचे आहे.

पाहा व्हिडिओ - 

टॅग्स :snakeसापthaneठाणे