शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आता 'मिस कॉल, 'एसएमएस' करून नोंदवा वीज खंडीत झाल्याची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 11:07 IST

वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार आता 'मिस कॉल' व 'एसएमएस' करून नोंदविण्याची सुविधा महावितरणने उपलब्ध करून दिली आहे.

डोंबिवली - शहरात पंधरवडयापासून वीज पुरवठा खंडीत होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे ग्राहक हैराण झाले असून तक्रार करण्याची पद्धत क्लिष्ट असल्याने ती सोपी कशी करता येईल या ग्राहकांच्या मागणीची दखल महावितरणने घेतली आहे. त्यामुळे आता वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार आता 'मिस कॉल' व 'एसएमएस' करून नोंदविण्याची सुविधा महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी ०२२-४१०७८५०० हा क्रमांक देण्यात आला असून महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या ग्राहकांनाच या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

याशिवाय ‘नोपॉवर’टाईप करून त्यानंतर स्पेस देऊन बारा अंकी ग्राहक क्रमांक टाईप करून ९९३०३९९३०३ या क्रमांकावर एसएमएस पाठवून खंडित वीजपुरवठ्याची तक्रार करता येईल.  त्यामुळे कल्याण परिमंडळातील जास्तीत-जास्त वीज ग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी करून या सुविधेचा लाभ घेण्याचे व डिजिटल माध्यमातून वीजबिल भरण्याचे आवाहन मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी केले आहे. मिसकॉल दिल्यानंतर मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची प्रक्रिया समजावणारा संदेश पाठविण्यात येईल. नोंदणी करावयाच्या मोबाईलवर ‘एमआरईजी’टाईप करून त्यानंतर एक स्पेस देऊन आपला बारा अंकी ग्राहक क्रमांक टाईप करावा व ९९३०३९९३०३ या क्रमांकावर संदेश पाठवावा. या एका संदेशाद्वारे तसेच महावितरणच्या संकेतस्थळावरील कंझुमर पोर्टल, महावितरणचे मोबाईल अ‍ॅप, तसेच १८००२३३३४३५, १८००१०२३४३५, १९१२ या टोल-फ्री क्रमांकांवर फोन करून मोबाईल क्रमांक नोंदविता येतो.

स्वयंचलित प्रणालीद्वारे वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदवून तक्रार नोंदणी क्रमांक ग्राहकांना पाठविण्यात येईल. संबंधित क्षेत्रातील अधिकारी-कर्मचा-यांना या तक्रारीचे निराकरण करण्याची सूचना स्वयंचलित प्रणालीमार्फत दिली जाईल. या सूचनेनुसार संबंधित भागातील वीजपुरवठा सुरळीत केला जाईल. याशिवाय मोबाईल अ‍ॅप व टोल फ्री क्रमांकावर खंडित वीजपुरवठ्याची तक्रार करण्याची सुविधा अबाधित आहे.

स्थिर आकारातील सवलत केवळ उद्योजकांनाच

स्थिर आकारातील सवलत केवळ व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील ग्राहकांना देण्यात आली आहे. त्यामुळे गैरसमज न ठेवता घरगुती ग्राहकांनी त्यांच्या वीजबिलाचा भरणा डिजिटल माध्यमातून करावा.  घरगुती ग्राहकांना वीजबिल भरण्यास मुदतवाढ देण्यात आली असली तरीही एकाच वेळी येणारा अतिभार टाळण्यासाठी कल्याण परिमंडळातील वीज ग्राहकांनी डिजिटल माध्यमातून आॅनलाईन वीजबिल भरून गैरसोय टाळावी, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे अग्रवाल यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : ...अन् आईने आजारी मुलासाठी केला 6 राज्यांतून तब्बल 2700 किलोमीटरचा प्रवास

Coronavirus : कोरोनाचा भारतीय नौदलात शिरकाव, 20 नौसैनिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

Coronavirus : चिंताजनक! जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 22 लाखांवर, तब्बल 154,247 जणांचा मृत्यू

कोरोनाचे रहस्य : ‘तो’ दावा आयसीएमआरने नाकारला

 

टॅग्स :electricityवीजthaneठाणेMobileमोबाइल