शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

आयुक्त बोडके यांची बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 00:57 IST

कल्याण-डोंबिवली महापालिका : विजय सूर्यवंशी यांची नियुक्तीलोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त गोविंद बोडके यांची सरकारने बदली केली असून, त्यांच्या जागी डॉ. विजय सूर्यवंशी यांची नियुक्ती झाली आहे. बोडके यांची बदली ही नैमित्तिक आहे. सूर्यवंशी हे रायगडचे जिल्हाधिकारी असून, ते कधी पदभार स्वीकारणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार बोडके यांनी १९ मार्च २०१८ ला घेतला होता. त्यापूर्वी बोडके हे सरकारच्या मत्स्य विभागात कार्यरत होते. ते भारतीय प्रशासकीय सेवेत बढती मिळून आयुक्त झाले होते. महसूल विभागाचा त्यांना अनुभव होता. त्यामुळे महापालिकेचा कारभार ते प्रथमच हाकत होते. महापालिकेत बोडके यांनी एक वर्ष, ११ महिने काम पाहिले. मात्र, त्यांनी महापालिकेचा पदभार घेतल्यावर आधारवाडी डम्पिंगची समस्या सोडवू, असे म्हटले होते. मात्र, कचऱ्याची समस्या पूर्णपणे सुटलेली नाही. डम्पिंग ग्राउंड ते बंद करू शकले नाहीत. त्यामुळे अधिकाऱ्यांचे पगार रोखण्याचे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. दरम्यान, बोडके यांच्या आधी काम पाहणारे आयुक्त पी. वेलरासू यांची बदली आधारवाडी डम्पिंगच्या कचºयाला लागलेल्या आगीमुळे झाली होती.

वेलरासू यांच्या कार्यकाळात महापालिका आर्थिकदृष्ट्या सबळ नव्हती. त्यामुळे त्यांनी आर्थिक बाबींचा वस्तूस्थितीदर्शक अहवाल मांडला होता. त्यांच्या पश्चात बोडके यांच्याही कारकिर्दीत विकासकामे होत नसल्याची ओरड सर्वपक्षीय सदस्यांकडून केली गेली. कररूपातून मिळणारे उत्पन्न कमी आणि विकासकामे जास्त असून, बोडके त्यातून वाट काढत होते. मात्र, आॅक्टोबरमध्ये असलेली महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून त्यांची बदली करण्यात आली आहे.

आॅक्टोबर २०१५ मध्ये महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी केडीएमसीला ई. रवींद्रन हे नवे आयुक्त मिळाले होते. १९९९ मध्ये श्रीकांत सिंह हे थेट आयएएस अधिकारी महापालिकेच्या आयुक्तपदी होते. त्यांच्यानंतर आयएएस अधिकारी म्हणून रवींद्रन लाभले होते. त्यानंतर वेलरासू हे देखील थेट आयएएस होते. महापालिकेचा चेहरामोहरा आयएएस अधिकारी बदलू शकतो, अशी चर्चा केली गेली. मात्र, त्यांच्याकडून कोणतेच प्रयत्न झाले नाहीत. आता पुन्हा सूर्यवंशी हे आयएएस अधिकारी म्हणून महापालिकेस लाभले आहेत.

नव्या आयुक्तांपुढील आव्हानेच्सूर्यवंशी यांना महापालिका निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाचे नगरसेवक त्यांची कामे मार्गी लागावीत, यासाठी त्यांना तगादा लावतील.च्महापालिकेत शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष असून, त्यामुळे प्रशासकीय प्रमुख म्हणून नव्या आयुक्तांची राजकीय कोंडी केली जाऊ शकते.च्आधारवाडी डम्पिंग बंद करणे, उंबर्डे, बारावे आणि मांडा प्रकल्प सुरू करणे, फेरीवाला प्रश्न, पार्किंगची व्यवस्था करणे, आरोग्यसेवेचा प्रश्न सोडविणे, यावर भर द्यावा लागणार आहे.च्महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने उत्पन्नवाढीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याचे आव्हान असेल. त्याचबरोबर २७ गावे वगळल्यास महापालिकेची हद्द कमी होईल. त्या दृष्टीने नियोजन करणे याचा सामना नव्या आयुक्तांना करावा लागणार आहे.