शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

डोंबिवलीतील पादचारी पुलाची दुरुस्ती कूर्मगतीने, पादचाऱ्यांना त्रास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 01:03 IST

डोंबिवली रेल्वेस्थानकातील कल्याण दिशेकडील पादचारी पुलाची दुरुस्ती महिनाभरापासून सुरू आहे. हा पूल बंद असल्यामुळे मधल्या पादचारी पुलावरून प्रवाशांना येजा करावी लागत आहे.

डोंबिवली - डोंबिवली रेल्वेस्थानकातील कल्याण दिशेकडील पादचारी पुलाची दुरुस्ती महिनाभरापासून सुरू आहे. हा पूल बंद असल्यामुळे मधल्या पादचारी पुलावरून प्रवाशांना येजा करावी लागत आहे. पूल तोडण्याचे काम कूर्मगतीने सुरू असून प्रवाशांना त्रास होत आहे. त्यामुळे हे काम वेगाने करण्याची मागणी उपनगरीय प्रवासी महासंघाने मध्य रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.ठाणे स्थानकातील पादचारी पूलही दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला आहे. त्याचेही काम सुरू नाही, त्यामुळे पावसाळ्याआधी हे दोन्ही पूल तयार होणे अशक्य आहे. प्रवाशांना पावसाळ्यात त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. ठाणे स्थानकात प्रवाशांना पुलाचे अन्य पर्याय आहेत, पण त्या तुलनेने डोंबिवलीत पर्याय नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आधीच नवा पूल तयार करून त्यानंतर जुना पूल तोडणे अपेक्षित होते.पण, थेट पूल बंद करण्यात आला आहे. त्यामुळे समस्येत वाढ झाली आहे. सध्या डोंबिवली स्थानकात दोन पादचारी पूल असल्याने त्या पुलांवरूनच लाखो प्रवासी येत असतात. त्यामुळे समस्येमध्ये वाढ होत आहे. त्या पुलाची रुंदी ४.५ मीटरवरून सहा मीटर करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने कोणतेही बदल आतापर्यंत झालेले नाहीत. त्यामुळे त्याची रुंदी वाढवण्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. भविष्यातील गर्दीचे लोंढे बघता पुलाची रुंदी वाढवणे आवश्यक आहे.पुलाचे काम किती वेळात व्हावे, याचे कुठलेही नियोजन रेल्वे प्रशासनाकडे नाही. त्यासंदर्भात विचारणा केल्यानंतर कोणताही विभाग त्याची माहिती देत नाही. त्यामुळे जेव्हा प्रवासी संघटनांना यासंदर्भात माहिती विचारतात, त्यावेळी आम्ही नेमके काय सांगायचे? स्थानिक रेल्वे प्रशासनही यासंदर्भात माहिती देत नाही. त्यामुळे प्रवाशांनी विचारायचे तरी कोणाला, असा सवाल संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी केला. रेल्वे प्रशासन आणि प्रत्यक्ष काम करणाºया कंत्राटदार यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याचे निदर्शनास येते, त्याचा फटका प्रवाशांना बसतो.रेल्वे प्रशासनाने जूनपर्यंत काम करणार, असे म्हटले असेल, तर आणखी ६० दिवसांचा अवधी आहे. त्यामुळे त्या कालावधीत निश्चितच काम झपाट्याने होईल. अभियंता विभागाचे त्यासंदर्भात नियोजन असेल.- ए.के. जैन,वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी,मध्य रेल्वे

टॅग्स :dombivaliडोंबिवली