शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
3
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
4
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
5
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
6
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
7
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
8
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
9
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
10
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
11
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
13
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
14
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
15
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
16
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
17
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
18
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
19
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
20
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस

तलावातील गाळ काढल्याने पाणीसमस्या सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 23:33 IST

माहुली परिसरातील टंचाई दूर होणार; पाणी साठवण्याची क्षमता वाढणार

वासिंद : माहुली परिसरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी येथील दोन तलावांमधील २४,८६१ मेट्रिक टन गाळ काढण्याचे काम नुकतेच करण्यात आले. यामुळे आता या तलावांची पाणी साठवण्याची क्षमता वाढणार आहे.माहुली किल्ल्याच्या कुशीतील माहुली, आवाळे, चांदरोटी, मामणोली, कराडे या पाच महसुली गावांमध्ये आणि त्यातील १८ पाड्यांमध्ये यंदा टँकरने पाणीपुरवठा करावा लागला. टँकरचे पाणी ओतता यावे, यासाठी जेएसडब्ल्यू कंपनीद्वारे पाच हजार लीटर क्षमतेच्या दोन टाक्या दिल्या गेल्या. मात्र, मुळातच टँकरद्वारे पाणी द्यावे लागू नये, तसेच भूगर्भजल वाढावे, यासाठी या दोन तलावांतील गाळ काढण्याची मागणी माहुली ग्रामपंचायतीने जेएसडब्ल्यू कंपनीकडे केली होती. लोकांना तसेच जनावरांनाही पाणीटंचाई भेडसावते. प्राण्यांना पाणीटंचाईच्या झळा जाणवू नयेत आणि त्यांना पिण्यास पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी वनक्षेत्रपाल दर्शन ठाकूर यांनी हा प्रस्ताव कंपनीकडे मांडला. जेएसडब्ल्यू कंपनीचे पब्लिक रिलेशन आॅफिसर चिन्मय पालेकर यांनी हे काम कंपनीने सामाजिक उत्तरदायित्व (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) म्हणून हाती घेतल्याचे सांगितले.उपसरपंच प्रदीप आगिवले यांनी या तलावाच्या पाझरामुळे परिसरातील विहिरींमध्ये उन्हाळ्यात पाणी टिकेल आणि तलावाच्या आसपास असलेल्या शेतामध्ये भाजीपाल्याचे पीक घेता येईल, असा विश्वास व्यक्त केला. जेएसडब्ल्यू कंपनीने यापूर्वी कसारा येथील टोकरवाडी आणि वासिंदजवळील कातबाव तलावातील ३० हजार क्युबिक मीटर गाळ काढला होता. यावर्षी २४,८६१ क्युबिक मीटर गाळ काढून तलावांची धारणक्षमता ५४,८५१ क्युबिक मीटरने वाढवली आहे. शहापूर तालुक्यात पडणारा पाऊस अशा रीतीने अडवून जमिनीत जिरवल्यास तालुका टँकरमुक्त होण्यास निश्चितच मदत होईल.