शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
5
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
6
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
7
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
8
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
9
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
10
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
11
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
12
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
13
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
14
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
15
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
16
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
17
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
18
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
19
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
20
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...

येऊरमधील दर्ग्याचे अतिक्रमण हटवा, अन्यथा दर्ग्याशेजारी मंदिर उभारू; संदीप पाचंगे यांचा इशारा

By अजित मांडके | Updated: May 2, 2023 12:32 IST

कान्हेरी हिल परिसरातील संवेदनशील क्षेत्रात हालचाली वाढल्याने एअरफोर्सचा आक्षेप 

ठाणे : अनधिकृत मशिदी, मजारी, दर्गे, पीर उभारून जागा बळकावण्याच्या प्रकाराविरोधात राज्यभर संताप व्यक्त होत असताना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने ( मनविसे) ठाण्यातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊरमधील मामा - भांजे डोंगरावरील 'लॅड जिहाद' उघडकीस आणला आहे. पर्यटकांचा राबता असलेल्या येऊरमधील या मामा-भांजे दर्ग्याशेजारी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने हाकेच्या अंतरावर असलेल्या कान्हेरी हिल येथील भारतीय वायुसेनेच्या तळाला धोका निर्माण झाला आहे. वनविभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ही अतिक्रमणे वाढत आहेत. तेव्हा, अनधिकृत धर्मस्थळापेक्षा देशाची सुरक्षा महत्वाची असल्याने प्रशासनाने हे अतिक्रमण तत्काळ हटवावे, अन्यथा, दर्ग्याशेजारीच शंकराचे मंदिर उभारण्याचा इशारा मनविसेचे राज्य सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक व वनसंरक्षक यांना लेखी निवेदना द्वारे दिला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यात राज्यभरातील अनधिकृत मस्जीद,मजार आणि दर्ग्याकडे सरकारचे लक्ष वेधले होते. त्यानंतर सरकारने तत्परतेने माहिम व सांगलीतील मजारवर तातडीने कारवाई केली होती. असाच एक 'लँड जिहाद' ठाण्यातील येऊर परिक्षेत्रात समोर आला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, येऊर वनक्षेत्रातील मामा-भांजे दर्ग्याच्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण करण्यात आले आहे. याठिकाणी दर्ग्याशेजारी मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे करण्यात आल्याच्या अनेक तक्रारी स्थानिकांनी मनविसेकडे केल्या आहेत. एरव्ही, एअर फोर्स स्टेशनच्या १०० मीटर परिसरात झाडे लावण्यास देखील मनाई असताना बिनदिक्कतपणे अशाप्रकारे अनधिकृत बांधकामे सुरु आहेत.

वायुसेनेच्या या युनिटच्या परिसरात मामा-भांजे दर्ग्या लगत काही अनोळखी लोक स्थलांतरित झाल्याने राष्ट्रीय सुरक्षिततेला देखील धोका निर्माण झाला आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत, भारतीय वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी पत्रव्यवहार करून वन विभाग आणि जिल्हा प्रशासनाने येथील बेकायदा बांधकामे त्वरीत हटविण्याची मागणी प्रशासनाकडे केली. मात्र, ढिम्म प्रशासनाने रमजान सण असल्याचे निमित्त सांगुन कारवाईत चालढकल सुरु केली. त्यामुळे, मनविसेने थेट वनविभागाकडे निवेदन देऊन या अनधिकृत दर्ग्याचे बांधकाम त्वरीत हटवण्याची मागणी केली असुन अन्यथा या दर्ग्याशेजारीच शंकर मंदिर उभारण्यात येईल. असा गर्भित इशारा मनविसेने दिला आहे. 

एअरफोर्सच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा दर्गा धोकादायक 

निसर्गरम्य येऊरचे जंगल म्हणजे ठाणे शहराचे वैभव आहे. मुंबई आणि ठाणे शहराच्या मधोमध असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या येऊरच्या दक्षिणेकडे उंच डोंगर माथ्यावर मामा-भांजे दर्गा आहे. या डोंगरावर समाधी घेतलेल्या हजरत सय्यद बहाउद्दीन आणि हजरत सय्यद बद्रुद्दीन या सुफी पंथांच्या मामा-भाच्यांचे दर्गे असल्याची वदंता आहे. मात्र ते केव्हा आणि कसे आले याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. याठिकाणी दिवसेंदिवस पर्यटकांची गर्दी वाढत असल्याने त्या परिसरात अनधिकृत बांधकामे करण्यात आली असुन त्यामुळे एअरफोर्सच्या सुरक्षेलाही धोका निर्माण झाल्याचे दिसुन येत आहे. माहीम, सांगली  कुपवाड, मुंब्रा नंतर आता येऊरमधील बेकायदा दर्गा व मशिदींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.येऊर परिसरातील मामा-भांजे दर्ग्या शेजारी झालेल्या अनधिकृत बांधकामाबाबत आमच्याकडे तक्रारी आल्या होत्या. भारतीय वायु सेनेच्या अधिकाऱ्यांनी देखील याबाबत व तेथे राहणाऱ्या अनोळखी लोकांबाबत जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस प्रशासनाला कळविले आहे.तेव्हा, प्रशासनाने हे अनधिकृत बांधकाम तात्काळ हटवावे. अन्यथा, दर्ग्याशेजारी शंकराचे मंदीर उभारण्यात येईल.- संदीप पाचंगे, सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना.

टॅग्स :MNSमनसेthaneठाणे