शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

माणकोली प्रकल्प, रिंग रोडमधील अडचणी 2 महिन्यांत दूर करा, MMRDA अधिका-यांना राज्यमंत्र्यांची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 18:38 IST

कल्याण, डोंबिवली शहरांना वेगवान करणारा माणकोली प्रकल्प आणि रिंग रोड या दोन्ही प्रकल्पांमधील अडचणी, अडथळे तातडीने दूर करून कामाला सुरुवात करण्याचे आदेश एमएमआरडीचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी आयुक्त गोविंद बोडकेंना दिले.

डोंबिवली: कल्याण, डोंबिवली शहरांना वेगवान करणारा माणकोली प्रकल्प आणि रिंग रोड या दोन्ही प्रकल्पांमधील अडचणी, अडथळे तातडीने दूर करून कामाला सुरुवात करण्याचे आदेश एमएमआरडीचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी आयुक्त गोविंद बोडकेंना दिले. मंगळवारी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या मॅरेथॉन बैठकीत त्या प्रकल्पांसह स्मार्ट सिटी, मेट्रो, दुर्गाडी पूल आदी विषयांवर सखोल चर्चा झाली.राज्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले की, दिवसेंदिवस वेळकाढू पण होत असलेल्या या प्रकल्पांमुळे शहरांतर्गत विकासकामांना खीळ बसू नये यासाठी ही बैठक घेण्यात आली. त्याला एमएमआरडी, महापालिकेचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सगळ्यांसमोर महापालिका आयुक्तांना, शहर अभियंत्यांना त्यांना भेडसावणा-या अडचणींसंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच आगामी दोन महिन्यांत जमीन हस्तांतरणासह विविध अडथळयांवर तोगडा काढून प्रकल्प कामांना गती देण्याचे सांगण्यात आले.दुर्गाडीजवळील पुलाचे काम बंद असून ते तातडीने सुरू करण्यासाठी संबंधित ठेकेदाराकडून काम काढून घेण्यात यावे, नव्याने टेंडर द्यावे, आणि काम तात्काळ सुरू करण्यासंदर्भात विचार सुरू असल्याचे स्पष्टीकरण राज्यमंत्री चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला देण्यात आले. कल्याण डोंबिवली महापालिकेत स्मार्ट सिटीअंतर्गत जो निधी आला आहे, त्या निधीचा उपयोग करून प्रकल्प अंमलबजावणीला तातडीने सुरुवात करण्यासंदर्भात चर्चा झाली. त्या प्रकल्पाचे काम आयुक्त बोडके यांनी तातडीने सुरू करावा, असे तात्काळ आदेशीत करण्यात आले. तसेच मेट्रो प्रकल्पांतर्गत तरतूद करण्यात येत असलेल्या निधीच्या माध्यमातून ४५ मीटरचे रस्ते तयार करणे यासह अन्य तांत्रिक कामांनाही वेळ न दवडता सुरुवात करावी, असेही सांगण्यात आले.कल्याण-शीळ मार्गावरील शीळ जंक्शन येथून जाणा-या उड्डाणपुलाचे काम संथ गतीने सुरू असून, तेही तातडीने सुरू करण्यात यावे. त्या कामामध्ये ज्या अडचणी असतील त्या तातडीने संबंधित विभागांनी सोडवाव्यात. तसेच काही समस्या असतील तर मंत्रालय, एमएमआरडीए विभागाकडून त्या सोडावाव्यात असेही सांगण्यात आले. भोपर,माणगाव आदी गावामधील पाण्याची समस्या तातडीने सोडवावी, तेथील नागरिकांना दिलासा द्यावा, तसेच त्या ठिकाणी नवी पाण्याची पाइप लाइन टाकावी असेही सांगण्यात आले. ग्रोथ सेंटर करण्यासाठी प्रत्यक्ष कामाची गती दिसू द्या, कागदावर प्रकल्प नकोत असेही ते म्हणाले. कल्याण शीळ मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्याच्या दृष्टीने वरील प्रकल्पांना गती देणे, ते वेळेत पूर्ण करणे अत्यावश्यक असल्याचेही चव्हाण म्हणाले.