शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णाचा मृत्यु झाल्यामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्याला नातेवाईकांची धक्काबुक्की

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 21:24 IST

छातीत दुखत असल्यामुळे लोकमान्यनगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच योगेश कढरे (३९) या रुग्णाचा मृत्यु झाल्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रुग्णालयीन कर्मचााºयाला धक्काबुक्की करीत आपला संताप व्यक्त केला.

ठळक मुद्देलोकमान्यनगर येथील घटनाअकस्मिक मृत्युची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: छातीत दुखत असल्यामुळे लोकमान्यनगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच योगेश कढरे (३९) या रुग्णाचा मृत्यु झाल्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रुग्णालयीन कर्मचााºयाला धक्काबुक्की करीत आपला संताप व्यक्त केला. ही घटना मंगळवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली.योगेश यांना मंगळवारी सकाळी छातीत तीव्र वेदना होत असल्यामुळे त्यांना त्यांच्या कुटूंबीयांनी लोकमान्यनगर येथील लोकमान्य रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करता यावा, यासाठी त्यांना तातडीने सुरुवातीला एक टॅबलेट देण्यात आली. त्यानंतर त्रास कमी होण्यासाठी एक इंजेक्शनही देण्यात आले. मात्र, त्यांचा त्रास कमी होण्याऐवजी एक तासाभराने त्यांचा मृत्यु ओढवला. डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या उपचारामुळेच आपला रुग्ण दगावल्याचा आरोप करीत कढरे यांच्या नातेवाईकांनी या रुग्णालयातील एका कर्मचाºयाला धक्काबुक्की करीत त्याठिकाणी संताप व्यक्त केला. ही माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेले वर्तकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांनी जमावाला शांत केले. योगेश यांना लागोपाठ हह्दयविकाराचा तीव्र धक्का बसल्याची शक्यता रुग्णालयाने व्यक्त करीत आपल्यावरील आरोप फेटाळून लावले. त्यामुळे याप्रकरणी आकस्मिक मृत्युची नोंद करुन योगेश यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. जर या अहवालात डॉक्टरांची चुकी आढळली तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असे आश्वासन घाटेकर यांनी दिले. दरम्यान, रुग्णालयाचे डॉक्टर किंवा कर्मचाऱ्यांनी मारहाणीबाबत कोणतीही तक्रार दिली नसल्याचे वर्तकनगर पोलिसांनी ‘लोकमत’ला सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी