शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
2
Live in Partner Murder: प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्...
3
डोळ्यात मिरची पावडर टाकली मग गळा दाबून केला खून; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केला मोठा कांड
4
Stock Market Today: ७९ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; रियल्टी आणि ऑटो सेक्टरमध्ये तेजी, कारण काय?
5
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
6
रेल्वे तिकीट बुकिंग, पॅन, ITR सह अनेक नियमांमध्ये बदल; एटीएमच्या वापरावरही शुल्क, जाणून घ्या काय काय बदललं
7
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
8
तू काय माझ्याकडे डोळे वटारून बघतो?; राज ठाकरेंनी विचारलं, स्टेजवर बोलावलं, सगळेच हसले!
9
LPG Cylinder Price Cut: स्वस्त झाला LPG सिलिंडर... आजपासून कमी झाली किंमत; दिल्ली ते मुंबईपर्यंतचे हे आहेत नवे दर
10
काँग्रेसचे १५० नेते रशियाचे एजेंट, परदेशातून मिळायची फंडिंग; भाजपा खासदाराचा खळबळजनक दावा
11
'रामायण'च्या पहिल्या भागाचं शूटिंग पूर्ण, रणबीरची ऑनस्क्रीन लक्ष्मणासोबत गळाभेट; Video व्हायरल
12
Vijay Pendse Dies: इस्रोतील माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ विजय पेंडसे यांचे निधन
13
सव्वा लाखाची चप्पल? अहो, ही तर आमची कोल्हापुरी!
14
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
15
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
16
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
17
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
18
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
19
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
20
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे

बदलत्या काळात नाते मात्र तसेच - सुप्रिया पेठे

By admin | Updated: October 13, 2016 03:43 IST

पूर्वीच्या नातवंडांच्या शंका कुशंकाचे निरसन करायला हक्काचे आजी आजोबा असायचे आता मात्र त्यांची बौद्धिक भूक भागवण्याचे काम गुगल करीत

ठाणे : पूर्वीच्या नातवंडांच्या शंका कुशंकाचे निरसन करायला हक्काचे आजी आजोबा असायचे आता मात्र त्यांची बौद्धिक भूक भागवण्याचे काम गुगल करीत आहे. परंतु, या बदलत्या काळात नाते मात्र आजही तसेच आहे असे मत प्रथम क्रमांकाच्या विजेत्या सुप्रिया पेठे यांनी व्यक्त केले. अत्रे कट्ट्यावर ‘आजी - आजोबा कालचे आणि आजचे’ व ‘माझी निवृत्ती’ या दोन विषयांवर आयोजित केलेली वक्तृत्व स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. १५ ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या उत्साहात या स्पर्धेत सहभाग घेतला होता. पेठे यांनी त्यांची आजी, त्यांची आई आणि आता मी आजी असा तीन पिढ्यांतील आजी आजोबांवर खूपच मुद्देसूद विचार मांडले. माझी आजी गावाला राहत असल्याने तिथे गेल्यावरच तिची भेट होत असे. पण वयात आल्यावर तिने मला रितीरिवाजांपासून ते अगदी पंगत कशी वाढावी याचे धडे दिले. त्याकाळी क्लासेसचे प्रस्थ नव्हते. त्यामुळे माझी आई माझ्या मुलांना जेवूखावू घालायची, त्यांचे कौतुक करायची तर त्यांना गोष्टीही सांगायची. मी आजी झाले आहे. काळ खूप बदलला आहे. आता माझे काम म्हणजे त्यांच्या क्लासच्या वेळा संभाळणे. दोन क्लासच्यामध्ये नीट खाताहेत ना ते पहाणे. मुलांच्या वाढत्या क्षमता लक्षात घेऊन त्यांच्या या पालकांनी आपल्या वागण्यात बदल करावा असे पेठे यांनी सुचित केले. त्यांची महापालक ही संकल्पना परिक्षकांना भावली. मोबाईलचे आक्रमण अजिबात आवडले नसल्याची स्पष्टोक्ती तृतीय क्रमांकाच्या पद्मा खांबेटे यांनी केली. परंतु, हे त्यांचे आयुष्य असल्याने आपली ढवळाढवळ नको असेही त्या म्हणाल्या. उत्तेजनार्थ म्हणून बळवंत कर्वे व सुलभा आरोसकर यांची निवड करण्यात आली. त्यांनी निवृत्ती ही वृत्ती आहे व्याधी नाही हे लक्षात घेऊन ती कशी सार्थकी लावावी हे सांगितले.