शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयांकडून लसीसाठी नोंदणी; ८५८ रुग्णालयांनी केली कोरोना लसीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2020 07:07 IST

८५८ रुग्णालयांनी केली कोरोना लसीची मागणी

-सुरेश लोखंडेठाणे : कोरोना महामारीतून सुटका करणारी लस लवकरच उपलब्ध होणार आहे. त्यास अनुसरून ही महामारी थांबविण्यासाठी पहिल्या फळीत कार्यरत असणाऱ्या कोरोना योद्ध्यांना ती प्राधान्याने देण्याचे नियोजन राज्य शासनाने केले आहे. यासाठी जिल्ह्यातील सरकारी, निमसरकारी, खासगी रुग्णालये अशा एक हजार २५८ संस्थांपैकी ८५८ संस्थांनी ३१ ऑक्टोबरच्या डेडलाइन म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत या कोरोना लसीची मागणी राज्य शासनाद्वारे केंद्राकडे नोंदविल्याचे विश्वसनीय सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले.

नूतन वर्षारंभी कोरोना लस उपलब्ध होणार असल्याचे शुभसंकेत आहेत. या महामारीच्या पहिल्या फळीतील कोरोना योद्ध्यांना तिचे प्राधान्यक्रमानुसार वाटप करण्याचे राज्य शासनाचे नियोजन आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या नियंत्रणात जिल्ह्यातील ८५८ रुग्णालयांनी त्यांच्या अधिकाऱ्यांसह डाॅक्टर, परिचारिका, वार्डबाॅय आदींसाठी या कोरोना लसीची मागणी नोंदविली आहे. यामध्ये १५६ सरकारी रुग्णालय संस्थांपैकी ११३ संस्थांनी या लसीची मागणी नोंदविली आहे. तर एक हजार ७८ खासगी संस्थांपैकी ७४५ वैद्यकीय संस्थांनी तिची मागणी केंद्र शासनाकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत असलेल्या शेवटच्या मुदतीत केली आहे.

एका तज्ज्ञ खासगी संस्थेने जिल्ह्यातील या ८५८ सरकारी, खासगी वैद्यकीय संस्थांची नोंद केलेली आहे. या संस्थांना प्राप्त झालेल्या ऑनलाइन लिंकमध्ये या रुग्णालयांच्या पहिल्या फळीतील वैद्यकीय अधिकारी, डाॅक्टर आणि संबंधित कर्मचाऱ्यांच्या संख्येस अनुसरून लसीची मागणी केली आहे. तिची माहिती असलेली लिंक राज्य शासन आणि नंतर थेट केंद्र शासनाकडे सेंड केलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यात किती मनुष्यबळाला लस उपलब्ध होणार हे निश्चित सांगता येत नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. मात्र, जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांसह, आरोग्य केंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सहा महापालिकांची रुग्णालये, दोन नगर परिषदा, जिल्हा परिषद आदींचा आरोग्य विभाग, वैद्यकीय अधिकारी, डाॅक्टर, परिचारिका, वाॅर्डबॉय इत्यादींच्या मनुष्यबळाला ही लस प्राधान्याने देण्याचे नियोजन असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस