शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कागदपत्रांच्या आधारे देशभरातील आरटीओ कार्यालयांत स्क्रॅप वाहनांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 22:36 IST

तांत्रिकदृष्टीया बिघाड असलेली वाहने कंपनीने भंगारात काढल्यानंतर त्यांची बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) नोंदणी करणा-या दोन आरटीओ अधिका-यांसह चौघा जणांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडी युनिटने अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन कोटी २३ लाख ९७ हजार ९९८ रुपयांची ३४ वाहने जप्त करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे दोन आरटीओ अधिकाऱ्यांसह चौकडी जेरबंद४८१ पैकी सव्वादोन कोटींची ३४ वाहने जप्तठाणे पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : एका खासगी नामांकित कंपनीच्या स्क्रॅप (भंगारातील) वाहनांची खरेदी करून बनावट कागदपत्रांच्या आधारे महाराष्टÑासह देशभरातील विविध राज्यांतील प्रादेशिक परिवहन कार्यालयांत, आरटीओ कार्यालयात नोंदणी करून त्यांची विक्री करणा-या दलाल, विक्रेत्यांसह दोन आरटीओ अधिका-यांना जेरबंद केल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.टाटा मोटार्स लि. कंपनीने स्क्रॅप केलेल्या अशा ४८१ वाहनांची नोंदणी करण्यात आली असून त्यातील दोन कोटी २३ लाख ९७ हजार ९९८ रुपयांची ३४ वाहने जप्त केल्याचेही त्यांनी सांगितले. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडी युनिटने केलेल्या या धडक कारवाईमुळे राज्यभरातील आरटीओ अधिकाºयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. नारपोली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अशाच फसवणुकीच्या गुन्ह्याचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत हे तपास करत असताना स्क्रॅपची वाहने लिलावात विक्री केल्यानंतर काहींनी ही वाहने स्क्रॅप करण्यासाठी विकत घेतली. नंतर, मात्र तीच वाहने बनावट कागदपत्रांच्या आधारे आरटीओ कार्यालयात नोंदणी केल्याचे आढळले. या सर्व प्रकारामुळे राज्य शासनाचाही ३१ लाख ७७ हजार ५५८ रुपयांचा विक्रीकर बुडाल्याचा आढळले आहे. त्यामुळे राऊत यांनी याप्रकरणी भिवंडीतील कोनगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला. स्क्रॅपची वाहने खरेदी करणारा सचिन सोनवणे आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे बीड कार्यालयात नोंदणी करणारा दलाल शाकीर सय्यद यांना २९ आॅगस्ट २०१८ रोजी अटक केली. त्यांच्याकडे ३६ वाहनांच्या नोंदणीची बनावट कागदपत्रे आढळली. टाटा मोटार्स लि. कंपनीकडून स्क्रॅपसाठी दिलेली ४२८ व्यावसायिक वाहनांची महाराष्टÑात तसेच इतर राज्यांत बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी झाल्याचे आढळले. त्यापैकी २४ वाहने जप्त केली आहेत. तर याच कंपनीची ५३ प्रवासी वाहनांचीही अशाच प्रकारे विविध आरटीओ कार्यालयांमध्ये नोंदणी झाली. त्यातील १० वाहने जप्त केली असून दोन्हींमधील आणखी वाहने जप्त करण्याची कारवाई सुरू असल्याचेही पवार यांनी सांगितले. बीड कार्यालयातील तत्कालीन वाहन निरीक्षक राजेंद्र निकम आणि निलेश भगुरे यांनी अस्तित्वात नसलेली आणि स्क्रॅप करण्याची लेफट हॅण्ड वाहने बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी केल्याचे आढळल्यानंतर त्यांनाही २५ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, उपायुक्त दीपक देवराज आणि सहायक आयुक्त बाजीराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली राऊत आणि निरीक्षक अशोक होनमाने यांचे पथक याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीRto officeआरटीओ ऑफीस