शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानच्या हल्ल्यात पाकिस्तानचे ५८ सैनिक ठार; तालिबान सरकारने ISIS बद्दल काय सांगितलं?
2
'मुलींनी रात्री बाहेर पडू नये', दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरणावर ममता बॅनर्जींचे वादग्रस्त वक्तव्य
3
धक्कादायक! कपडे उतरवून पोलिसांनी हैवानासारखं मारलं, धमन्या फुटल्या; तरुणाचा मृत्यू
4
'वनडे क्वीन' स्मृतीनं रचला नवा इतिहास; ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन विरुद्ध साधला मोठा डाव
5
“कोकणाच्या भूमीतील या न्याय मंदिरातून स्थानिकांना जलद गतीने न्याय मिळेल”: एकनाथ शिंदे
6
‘लंच पे चर्चा’! राज ठाकरे आईसोबत पुन्हा मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम
7
गृह कर्जाचा हप्ता भरणं जड जातंय? ईएमआय कमी करण्यासाठी 'या' ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा आणि मोठी बचत करा!
8
“दादा भुसेंचे ट्रम्प यांच्याशी घनिष्ट संबंध असतील, पालकमंत्रीपद...”; गिरीश महाजनांचा टोला
9
अर्धा संघ तंबूत धाडत कुलदीप यादवनं रचला इतिहास; दिल्लीच्या मैदानात मारला विश्वविक्रमी 'पंजा'
10
तुम्हालाही मस्त नेलपेंट लावायला आवडते? ठरेल जीवघेणं, वाढू शकतो स्किन कॅन्सरचा धोका
11
तुम्हीही होऊ शकता कोट्यधीश! विद्यार्थी, गिग वर्कर्ससाठी 'मायक्रो SIP' चा नवा सुपरहिट ट्रेंड
12
"जर तुम्ही कॉफी बनवायला शिकला असाल तर...", राहुल गांधींच्या दक्षिण अमेरिका दौऱ्यावर भाजपचा निशाणा
13
“तरे म्हणाले होते हा माणूस दगा देईल, तेच झाले, आता पश्चाताप झाला नसता”; ठाकरेंची शिंदेवर टीका
14
नोकरीच्या बचतीची चिंता सोडा! 'या' ४ सोप्या मार्गांनी घरबसल्या तपासा तुमचा PF बॅलन्स
15
Pune Crime: गर्लफ्रेंडच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या पुरुषासोबतचे नग्न फोटो, बॉयफ्रेंडने केक कापायच्या चाकूनेच तरुणीची हत्या
16
घाईत घेतलेला निर्णय महागात; अमिताभ बच्चन यांनी मुलांच्या ओव्हर कॉन्फिडन्सवर टाकला प्रकाश
17
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पुन्हा पत्रकार परिषद घेणार, महिला पत्रकारांना विशेष आमंत्रण
18
अफगाणिस्तान vs पाकिस्तान; थेट युद्धात कोणाचे सैन्य वरचढ ठरेल? जाणून घ्या...
19
IND vs WI : बुमराहचा 'ट्रिपल फिफ्टी'चा रेकॉर्ड; वेळ घेतला; पण परफेक्ट यॉर्करसह साधला विकेटचा डाव
20
Rajya Sabha Election: भाजपने मुस्लीम नेत्याला उतरवले निवडणुकीच्या रिंगणात, तीन नावाची घोषणा

टाळेबंदीमुळे रखडलेल्या नवीन वाहनांच्या नोंदी अखेर पूर्ण, दोन महिन्यात ३ हजार ५४० वाहनांच्या नोंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 16:09 IST

लॉकडाऊनमुळे रखडलेली बीएस ४ या वाहनांची नोंदणी आता सुरु झाली असून मागील दोन महिन्यात ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाअंतर्गत ३५४० नव्या वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे.

ठाणे : कोरोनाच्या पाशर््वभूमीवर संपूर्ण देशात टाळेबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे टाळेबंदी पूर्वी ज्या ग्राहकांनी खरेदी केलेल्या बीएस ४ आणि नोंदणी रखडलेल्या वाहनांच्या नोंदणीची कामे ठाणे, कल्याण आणि नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन विभागाने एप्रिल आणि मे या दोन महिन्यांमध्ये ३ हजार ५४० नवीन वाहनांच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. यामध्ये दुचाकी, चारचाकी आणि छोटे टॅम्पो अशा वाहनांचा समावेश असून अनेक वाहनांची नोंदणी ही आॅनलाईन पद्धतीने करण्यात आली आहे.        देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २१ मार्चपासून केंद्र सरकारने टाळेबंदी लागू केली. त्यामुळे बीएस ४ च्या नव्या वाहनांची विक्र ी पुर्णपणे ठप्प झाली होती. टाळेबंदीच्या काळात वाहनांची विक्र ी ठप्प झाल्यामुळे वाहन उद्योगाला मोठा फटका बसला आहे. असे असले नागरिकांनी टाळेबंदीच्या पूर्वी खरेदी केलेली आणि कर्जाच्या प्रक्रि येत अडकेल्या वाहनांची नोंदणीची कामे ठाणे, कल्याण आणि नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांनी मार्गी लावली आहेत. त्याचबरोबर बीएस ४ वाहनांची ३० मार्च पर्यंत नोंद करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, त्या आधीच टाळेबंदी लागू झाल्यामुळे या वाहनांची नोंदणी बंद करण्यात आली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने टाळेबंदीच्या काळात रखडलेल्या बीएस ४ या वाहनांच्या नोंदणी करण्याबाबत मुदत वाढवून देण्यात आली. त्यानुसार बहुतांश बीएस ४ वाहनांची नोंदणी प्रक्रि या प्रादेशिक परिवहन विभागाने सुरु केली. त्यानुसार एप्रिल आणि मे या दोन महिन्यांच्या कालावधीत ठाणे जिल्ह्यात एकुण ३ हजार ५४० नवीन वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे.यामध्ये ठाणे उपप्रादेशिक कार्यालात दोन महिन्यामध्ये १ हजार ६९० वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यामध्ये १ हजार ३८३ दुचाकी, १०० कार, ४० छोटे टेम्पो, ९३ तीनचाकी आणि २४ अवजड वाहनांचा समावेश आहे. तर, कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे१ हजार २९० वाहनांची एप्रिल आणि मे या दोन महिन्यात नोंदणी करण्यात आली आहे. त्यामध्ये १ हजार ५३ दुचाकी, ७३ कार, ३६ छोटे टेम्पो, ९५ तीनचाकी आणि १० अवजड वाहनांचा समावेश असून नवी मुंबई उपप्रादेशिक कार्यालयाने टाळेबंदीच्या दोन महिन्यात ६६० वाहनांची नोंदणी पुर्ण केली आहे. यातील बहुतांश वाहनांची नोंदणी ही आॅनलाईन पद्धतीने करण्यात आली. तसेच प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनांची नोंदणी करण्यासाठी आलेल्या नागरिकांना सोशल डिस्टंगसीच्या नियमनाचे पालन करण्यात येत असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक यांनी दिली. कोरोनाच्या पाशर््वभूमीवर टाळेबंदी लागू झाल्यामुळे अनेक बीएस ४ गाड्यांची नोंदणी रखडली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार नोंदणी करण्यात आल्या असून शासनाला या नोंदणी प्रक्रि येतून महसूल प्राप्त झाला आहे. तसेच आता, केवळ पर्यावरणाची अधिक काळजी घेणाऱ्या वाह्नांचीच नोंद करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाbikeबाईक