शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता कर कमी करा, अन्यथा आंदोलन; मनसेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 03:57 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनसेचे पत्र

कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महासभेत मोकळया भूखंडावरील (ओपन लॅण्ड टॅक्स) कर कमी करण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात पार पडलेल्या महासभेत घेतला गेला असतानाही नागरिकांवर लादलेला वाढीव मालमत्ता कर त्वरित कमी करावा अन्यथा रस्त्यावरील आंदोलन व न्यायालयीन लढ्याचा दुहेरी मार्ग अवलंबिला जाईल, असा इशारा कल्याण शहर मनसेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात देण्यात आला आहे.मोकळ््या भूखंडावरील कर कमी करण्याचा निर्णय हा बिल्डर हिताचा असल्याने सामान्य करदात्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. १९८३ ते १९९५ या प्रशासकीय राजवटीत ४८ टक्के मालमत्ता कर आकारला जात होता. मात्र २००५ मध्ये विविध विकास कामांसाठी निधी देण्याकरीता राज्य सरकारने कर वाढविण्याची अट ठेवली होती. त्यावेळी दोनदा मालमत्ता कर वाढविला गेला होता. याकडे मनसेने लक्ष वेधले आहे. दरम्यान निधीतील विकासकामे पूर्ण झाली असल्याने मालमत्ता कर कमी करण्यासाठी संबंधित विभागाला आदेश द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे, असे मनसेचे उपाध्यक्ष अशोक (काका) मांडले, सरचिटणीस आणि माजी आमदार प्रकाश भोईर यांच्यासह इरफान शेख, उल्हास भोईर, कौस्तुभ देसाई, कैलास पनवेलकर, महेश मोरे आदी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.नागरिकांसाठी का नाही?मालमत्ता करात वाढ करण्यात आली, परंतु करदात्यांच्या बाबतीत सोयी-सुविधांची वानवाच आहे. बिल्डरांसाठी उत्साह दाखविणारी मंडळी करदात्या नागरिकांचा कर कमी करण्यासाठी उत्साह का दाखवित नाहीत, असा सवाल मनसेचे राज्य सचिव इरफान शेख यांनी केला.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMNSमनसे