शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे-भिवंडीतील 1 हजार 756 तक्रारींचे एकाच दिवसात निवारण, पोलिसांची विशेष मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2020 23:56 IST

Thane News : पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या आदेशाने शनिवारी पश्चिम प्रादेशिक विभागात तक्रार निवारण कार्यशाळेत ठाणे, भिवंडी आणि वागळे इस्टेट या परिमंडळातील १,८६१पैकी तब्बल एक हजार ७५६ तक्रारींचा निपटारा एका दिवसात केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

- जितेंद्र कालेकरठाणे - एखादा अर्ज अनेक दिवस पोलीस दप्तरी पडून राहतो. त्याची निर्गती होत नसल्यामुळे अर्जदारांचे समाधानही होत नाही. याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या आदेशाने शनिवारी पश्चिम प्रादेशिक विभागात तक्रार निवारण कार्यशाळेत ठाणे, भिवंडी आणि वागळे इस्टेट या परिमंडळातील १,८६१पैकी तब्बल एक हजार ७५६ तक्रारींचा निपटारा एका दिवसात केल्याची माहिती सूत्रांनी दिली.अनेकदा एकच तक्रार वरिष्ठ पोलीस निरीक्षकांपासून ते पोलीस आयुक्त आणि थेट गृहमंत्र्यांपर्यंत जाते. एकच तक्रार वेगवेगळ्या वरिष्ठ कार्यालयांमधून पुन्हा संबंधित पोलीस ठाण्यात येत असल्यामुळे, त्यामध्ये पोलीस ठाण्यासह संपूर्ण यंत्रणेचा वेळ खर्ची पडतो.  यात सुसूत्रता येण्यासाठी या सर्व अर्जांचे वर्गीकरण करून त्यांच्या निपटाऱ्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी अलिकडेच दिले होते.  

 या तक्रारींचा होता समावेश यातील अनेक तक्रारी या जमिनीचे वाद, आर्थिक देवाण-घेवाण (फसवणूक वगळता) या दिवाणी स्वरूपाच्या होत्या. काही तक्रारी या पती-पत्नींमधील वाद, शेजाऱ्याचे वाद आणि अगदी नळावरील भांडणे अशा किरकोळ स्वरूपाच्या होत्या. अशी प्रकरणे दोन्ही बाजू समोरासमोर ऐकून ती सामोपचाराने मिटविण्यात आली.  त्यामुळेच ठाणे शहर परिमंडळात ८८५ पैकी ८१४, वागळे इस्टेट परिमंडळामध्ये ६२८ पैकी सर्वच ६२८ तर भिवंडीमध्ये ३४८ पैकी ३१४ अर्जांचे निवारण केल्याची माहिती सूत्रांनी दिली. यात ठाणेनगर पोलीस ठाण्यात २०० पैकी १७५ तक्रारींचे निराकरण झाले, तर वागळे इस्टेट, कोपरी, वर्तकनगर, श्रीनगर, कापूरबावडी, कासारवडवली आणि चितळसर या पोलीस ठाण्यांनी सर्वच तक्रारींचे निवारण केले. 

या तक्रार निवारण मोहिमेत भिवंडीतील शांतीनगर पोलीस ठाण्यात अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे, मुंब्रा पोलीस ठाण्यात पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात उपायुक्त डॉ.विनय राठोड, कोनगाव येथे उपायुक्त योगेश चव्हाण या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही तक्रारदारांशी संवाद साधला. इतर पोलीस ठाण्यांमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह इतर पोलीस अधिकारी हजर होते. 

तक्रारी प्रलंबित राबण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळेच एकाच दिवशी ही विशेष मोहीम राबवून माझ्यासह तीन पोलीस उपायुक्तांनीही नागरिकांच्या तक्रारींचे निवारण केले. अनेक तक्रारी सामोपचाराने मिटविल्यामुळे नागरिकांनीही समाधान व्यक्त केले. - अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, ठाणे

टॅग्स :Policeपोलिसthaneठाणे