शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पुनर्विकास आराखड्याने क्लस्टर लांबणार

By admin | Updated: July 1, 2017 07:40 IST

क्लस्टर डेव्हलपमेंटवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठवल्याने मुख्यमंत्र्यांनीदेखील आता ठाण्यासाठी अखेर ४ एफएसआयला मंजुरी दिली आहे.

अजित मांडके । लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : क्लस्टर डेव्हलपमेंटवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठवल्याने मुख्यमंत्र्यांनीदेखील आता ठाण्यासाठी अखेर ४ एफएसआयला मंजुरी दिली आहे. या वाढीव एफएसआयचा झोपडपट्टी विभागाला अधिक फायदा होणार असला, तरी काही जुन्या योजना बंद कराव्या लागणार आहेत. तसेच प्रधानमंत्री आवास योजनादेखील काहीशी रखडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.असे असले तरी आता पालिकेला पुन्हा या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अर्बन रिन्युअल प्लान अर्थात शहर पुनर्विकास आराखडा तयार करून त्यावर हरकती व सूचना मागवून शासनाची मंजुरी घ्यावी लागणार आहे. यासाठी मोठा कालावधी जाणार असून, कोर्टकचेरी झाल्यास तो आणखी लांबणार आहे. यामुळे क्लस्टरच्या चार एफएसआयचे स्वप्न मृगजळ ठरण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लस्टर डेव्हलपमेंट मंजूर केल्याची घोषणा केल्यानंतर उच्च न्यायालयानेदेखील त्याला ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यानंतर, आता ठाण्यासाठी एक, दीड, अडीच आणि चार एफएसआय मिळावा म्हणून मागील काही महिन्यांपासून पाठपुरावा सुरू होता. तो मंजूर झाल्याने ठाण्याचा विकास होण्यास मदत होणार आहे. चार एफएसआय ही चांगली बाब असली तरी त्यात काही अडचणीदेखील असणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. ही योजना राबवताना नेमक्या किती इमारती बांधता येतील, त्या कशा बांधाव्यात, याची ब्ल्यू प्रिंट पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने सादर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या योजनेला मंजुरी दिली आहे. नव्वदच्या दशकात पालिकेने शहरविकास आराखडा मंजूर केल्यानंतर हे शहर वेगाने विकसित झाले. शहरीकरणाच्या रेट्यात पूर्वीच्या सोयीसुविधा कोलमडल्या. शहरात क्लस्टर योजनेची अंमलबजावणी करताना प्रथम विकास आराखड्यात नवीन नियमांना मंजुरी घ्यावी लागणार आहे. सुधारित विकास आराखड्याचा ठराव मंजूर करावा लागेल. विकास नियंत्रण नियमावलीनुसार कलम ३७ नुसार पालिकेला या योजनेच्या नियमासह विकास नियंत्रण नियमावलीत सुधारणा करावी लागेल. त्यानंतर, ते सरकारकडे मंजुरीसाठी पाठवून क्लस्टरची सीमानिश्चिती करावी लागणार आहे. गेली १० वर्षे मोठ्या मेहनतीने मार्गी लावलेल्या बीएसयूपी, राजीव आवास, एसआरडी, एसआरएसारख्या सर्वच घरबांधणी योजना एका फटक्यात बारगळणार असल्याचे दिसत आहे. क्लस्टर डेव्हलपमेंटचे अंतिम धोरण आणि आराखडा अद्याप यायचा बाकी असला तरी मूळ ठाण्यातल्या मालकीच्या जमिनी आणि अतिक्र मणे तसेच विविध शासकीय जमिनींवरचे निर्बंध यातून फाइल सहीसलामत मंजूर होताना कोर्टाला प्रदक्षिणा अटळ असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.