शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मांगरूळ डोंगरावरील वनसंपदा पुन्हा वणव्याच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 04:49 IST

सलग दुसरी घटना : ७० टक्के वृक्ष जळून खाक

अंबरनाथ : अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड पट्ट्यातील मांगरूळ गावाजवळील डोंगरावर लावलेल्या वणव्यात दुसऱ्यांदा वनसंपदा नष्ट झाली आहे. या डोंगरावर तीन हेक्टर जागेवर खा. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने वृक्षारोपण केले होते. गेल्या वर्षी हे वृक्ष वणव्यात सापडले होते. त्यानंतरही वनविभागाने पुन्हा ही झाडे जगवली. मात्र, बुधवारी रात्री लागलेल्या वणव्यात ७० टक्के वृक्ष जळाले.

मांगरूळ येथे वनविभागाच्या सुमारे ८० एकर जमिनीवर डॉ. शिंदे यांनी गेल्या वर्षी लोकसहभागातून एक लाख झाडे लावण्याचे महाअभियान राबवले होते. तब्बल १५ हजारांहून अधिक नागरिकांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत अवघ्या काही तासांत एक लाख झाडे लावली. या झाडांचे योग्य प्रकारे संगोपन व्हावे, यासाठी शिंदे यांनी या ठिकाणी स्वखर्चाने पाण्याच्या टाक्या आणि जलवाहिन्यांची व्यवस्था केली होती. मात्र, या वृक्षांनी मुळे धरलेले असतानाच गेल्या वर्षी या डोंगरावर वणवा लागला. त्यात ८० टक्के वृक्ष जळाले. सुदैवाने वृक्षांभोवती असलेले सुके गवत काढण्यात आल्याने त्यातील बहुसंख्य वृक्ष वाचवण्यात वनविभागाला यश आले होते. जळालेले वृक्ष वाचवण्यासाठी खा. शिंदे यांनीही खाजगी संस्थांची मदत घेत त्या वृक्षांचे संगोपन केले होते.

यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा या वृक्षांची वाढ झाली. एक लाख वृक्षांपैकी ९० टक्के वृक्ष जिवंत ठेवण्यात यश आले. मात्र, बुधवारी रात्री याच डोंगरावर वणवा लागल्याने त्यात अडीच हेक्टर डोंगरावरील सर्वच्या सर्व वृक्षांना झळ बसली. त्यातील काही वृक्ष पूर्ण जळाले, तर काही वृक्षांना वाचवणे शक्य होणार आहे. सलग दोन वर्षे एकाच डोंगरावर वणवा लागून वृक्ष जळत असल्याने वनविभागाचे अधिकारी नियोजन करण्यात कमी पडत असल्याचा आरोप खासदार शिंदे यांनी केला आहे. एकच चूक दोनवेळा झाल्याने आता त्यांनी संताप व्यक्त केला आहे.उपमुख्य वनसंरक्षकांच्या निलंबनाची मागणीमोठ्या प्रमाणात वनसंपदा असल्याने वनविभागाने कर्मचारी तैनात करणे अपेक्षित होते, असे मत खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले. वृक्षांच्या संवर्धनासाठी संरक्षक कुंपण घालण्याची मागणी केली होती. मात्र, त्याकडेही वनविभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप शिंदे यांनी केला. समाजकंटकांकडून आगी लावण्याचे प्रकार होत असल्याचा ठपका शिंदे यांनी ठेवला आहे. ठाण्याच्या उपमुख्य वनसंरक्षकांना जबाबदार धरून निलंबित करण्याची मागणी वनमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :thaneठाणेforestजंगलforest departmentवनविभाग