शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मीरा रोड येथील लसीकरणाचे वास्तव; पुढारी मंडळीच करताहेत दलाली, नागरिक नगरसेवक डॉक्टरच्या दालनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 09:54 IST

मीरा भाईंदर महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी प्रयत्न करात आहेत. परंतु, केंद्रांवर काही नगरसेवक, राजकारणी, तसेच पोलीस आदींकडून लसीकरणासाठी दलालांची भूमिका बजावली जात आहे.

धीरज परब मीरा रोड : तीन दिवस लसीकरण बंद असल्याने गुरुवारी नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली होती. सकाळी सहापासून दुपारच्या उन्हातान्हात तासनतास लसीकरणासाठी रांगेत असलेल्या सर्वसामान्यांचे हाल होत असताना दुसरीकडे एका भाजप नगरसेवकाने गोतावळ्यासह पालिकेच्या बाह्यरुग्ण विभागातील डॉक्टरच्या दालनात थेट लसीकरण करून घेतल्याने संताप व्यक्त केला.मीरा भाईंदर महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी प्रयत्न करात आहेत. परंतु, केंद्रांवर काही नगरसेवक, राजकारणी, तसेच पोलीस आदींकडून लसीकरणासाठी दलालांची भूमिका बजावली जात आहे. स्वतःच्या मर्जीतील लोकांच्या लसीकरणासाठी उपद्व्याप सुरू असल्याने नागरिक संतापले आहेत. शिवाय केंद्रावरील कर्मचारी आणि पोलिसही त्रासले आहेत. एकीकडे सामान्यांचे हाल चालले असताना दुसरीकडे आरोग्य केंद्रातील बाह्यरुग्ण विभागाचे डॉ. संदीप प्रधान यांच्या दालनात भाजप नगरसेवक रोहिदास पाटील हे पत्नी व अन्य निकटवर्तीय, तसेच भाजपचे माजी मंडळ अध्यक्ष श्रीपत मोरे, आदींसह लसीकरण करुन घेत होते. त्याचवेळी बाहेर तपासणीसाठी रुग्ण रांगेत होते.डॉ. प्रधान यांच्या दालनाबाहेर रांगेत असलेल्या नागरिकांकडे विचारणा केली असता त्यांनी लसीकरण नव्हे, तर तपासणीसाठी रांग असल्याचे सांगितले. त्यामुळे डॉ. प्रधान यांच्या दालनात प्रस्तुत प्रतिनिधी गेला असता, तिथे नगरसेवक पाटील यांच्या पत्नी लस घेत होत्या, तर नगरसेवक पाटील हे तिथेच बसले होते. डॉ. प्रधान यांच्यासह लसीकरण प्रमुख डॉ. अंजली पाटीलही उपस्थित होत्या. त्यानंतर नगरसेवकाच्या आणखी एका परिचितास लस दिली. त्यानंतर मोरे हे लस घेण्यासाठी आत आले. डॉ. पाटील यांच्याकडे विचारणा केल्यावर नगरसेवक तेथून निघून गेले. डॉ. पाटील यांनी डॉ. प्रधान यांना येथे लसीकरण कसे सुरू केले, असा जाबही विचारला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टर