शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

आपत्कालीन परिस्थितीसाठी अधिकारी झाले सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 06:44 IST

मुसळधार पावसामुळे शहरातील काही भागांना पूरस्थितीचा फटका बसतो. या आपत्तीचा सामना करण्यासाठी पालिका प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे, अशी माहिती आयुक्त मनोहर हिरे यांनी विभागीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिली.

भिवंडी - मुसळधार पावसामुळे शहरातील काही भागांना पूरस्थितीचा फटका बसतो. या आपत्तीचा सामना करण्यासाठी पालिका प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे, अशी माहिती आयुक्त मनोहर हिरे यांनी विभागीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिली.भिवंडी शहर खाडीकिनारी असल्याने मुसळधार पाऊस सुरू असताना भरतीच्या काळात शहराला अनेकवेळा पुराचा फटका बसला आहे. शहरातील सर्व बाजूंचे सांडपाणी खाडीत सोडले जाते. अशावेळी खाडीला भरती आल्यानंतर ते पाणी खाडीत न जाता खाडीकिनाºयावरील क्षेत्रात थांबते. या काळात घेण्यात येणाºया खबरदारीच्या उपाययोजनांमध्ये सर्व सरकारी विभागांचा समावेश व्हावा, यासाठी पालिका आयुक्त हिरे यांनी आपत्कालीन पूर्वनियोजन बैठक घेतली. या बैठकीला शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, टोरंट पॉवर कंपनीचे अधिकारी, एसटी महामंडळ भिवंडी आगारप्रमुखांचे प्रतिनिधी, बीएसएनएलचे अधिकारी उपस्थित होते.आयुक्त हिरे यांनी शहरातील परिस्थितीची माहिती घेतल्यानंतर सांगितले की, शहरात आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून शहरातील सर्व मुख्य नाल्यांची सफाई सुरू केली आहे. तसेच काही ठिकाणी नाल्यांची रुंदी व खोली वाढवण्यात येत आहे. काही नाल्यांची डागडुजी सुरू केली आहे. हे काम ३१ मे पूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाºयांना दिल्या आहेत. तसेच गटारांची सफाई सुरू केली आहे. महापालिकेत मुख्य आपत्कालीन कक्ष २४ तास कार्यरत राहणार आहे. आवश्यक साधनसामग्री तयार ठेवली आहे. तसेच नियंत्रण कक्षात वायरलेस सेवा,वॉकीटॉकी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.सर्व प्रभाग समिती कार्यालयात १ जूनपासून स्वतंत्र आपत्कालीन कक्ष सुरू करण्यात येणार आहेत. त्यामध्ये स्वतंत्र कर्मचाºयांची नेमणूक करण्यात येणार आहे. दरम्यान, पावसाळ्यात झाडे पडून दुर्घटना होऊ नये, म्हणून अगोदरच शहरातील झाडांची छाटणी सुरू केली आहे. तातडीची बाब म्हणून उद्यान विभागात स्वतंत्र झाडछाटणी पथक तैनात केले आहे. अग्निशमन विभागाला सतर्कतेचे आदेश दिले आहेत. खाडीकिनारी असलेली ईदगाह झोपडपट्टी, म्हाडा कॉलनी, संगमपाडा, अंबिकानगर, बंदर मोहल्ला या सर्व ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्यास जवळच्या शाळेत, सांस्कृतिक केंद्रात पूरग्रस्त नागरिकांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. तसेच त्या ठिकाणी नागरिकांची खाण्यापिण्याची सोय केली जाणार आहे.रस्त्यांचे नवीन खोदकाम करण्यास मनाई करण्यात आली आहे. जिथे गटारावर उघडी झाकणे नाहीत, तेथे तातडीने नवीन झाकणे लावावीत, याबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच डोंगरउतारावर राहणारे रहिवासी, झोपडपट्टीतील नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून नोटिसा बजावल्या आहेत. अतिधोकादायक इमारती पडून दुर्घटना घडू नये, म्हणून अशा इमारती रिकाम्या करण्याच्या सूचना प्रभाग अधिकाºयांना देण्यात आल्या आहेत.सामाजिक संस्थांची यादी बनवलीशहरातील वैद्यकीय व्यावसायिक, अधिकारी, रु ग्णवाहिका, सामाजिक संस्था, जीवनरक्षक पथक यांची यादी बनवली आहे. सर्व विभागांचे संपर्कनंबर जाहीर करण्यात आले आहेत.काही आपत्कालीन स्थिती आल्यास महापालिकेच्या मुख्य आपत्कालीन कक्षाच्या २५००४९ व २३२३९८ या दूरध्वनींवर संपर्क साधण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

टॅग्स :Bhiwandiभिवंडीnewsबातम्या