शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

सब घोडे बारा टक्के..! राजकीय नाट्याचा ठाण्यातील साहित्यिकांनी घेतला समाचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2019 01:34 IST

महाराष्ट्रात सत्तास्थापनेवरून शनिवारी सकाळी घडलेलं राजकीय नाट्य दिवसभर सर्वत्र चर्चिलं गेलं. प्रत्येकजण आपापल्या परीने यावर भाष्य करत होते.

- स्नेहा पावसकरठाणे : महाराष्ट्रात सत्तास्थापनेवरून शनिवारी सकाळी घडलेलं राजकीय नाट्य दिवसभर सर्वत्र चर्चिलं गेलं. प्रत्येकजण आपापल्या परीने यावर भाष्य करत होते. ठाण्यातील साहित्य क्षेत्रातील मंडळीनीही यावर आपल्या भाषेत शेरेबाजी केली आहे. आजचं हे एकूणच राजकीय नाट्य पाहून १९५२ साली विंदांनी लिहिलेली ‘सब घोडे बारा टक्के’ ही कविता आजच्या राजकारणालाही लागू पडते, असे स्पष्ट मत ज्येष्ठ कवी महेश केळुसकर यांनी यानिमित्ताने व्यक्त केले आहे.महाराष्टÑाच्या राजकारणात शुक्रवारी सकाळीच भूकंप झाला आणि त्याचे पडसाद अवघ्या काही मिनिटात सोशल मिडीयावरून उमटले. कवी महेश केळुसकर यांनी फेसबूकवर ‘काकांनी पावसात भिजवलेला ओला लंगोट वाळायच्या आत पुतण्याच्या ढुंगणाला खाज सुटली..., ताणता राजा’ अशा शब्दात पोस्ट शेअर केल्या. आज महाराष्टÑात जे काही घडलं ते मतदारांच्या आकलनापलीकडे चाललयं. विंदांनी लिहिलेली कविता आजही लागू पडते. पण विंदा असे म्हणाले होते की, ही कविता जेव्हा कालबाह्यहोईल तेव्हा मला आनंद होईल. पण विंदांना आनंद होईल असा क्षण येईल असे दिसत नाही, असेही केळुसकर म्हणाले.दुसरीकडे आजचा सगळा प्रकार म्हणजे सगळ्या प्राण्यांनाही लाजवेल असाच आहे. नीती, नियम, तत्त्व हे सगळं या राजकीय मंडळीनी सोडून दिलं आहे. तसेच आता कोणाचेही सरकार आले तरी, सर्व पक्षांच्याबाबत महाराष्टÑाच्या जनतेने अविश्वासाचा ठराव मूकपणे संमत केलेला आहे, हे नक्की अशा शब्दात कवी अशोक बागवे यांनी या राजकीय घडामोडीचा निषेध व्यक्त केला.अरूण म्हात्रे यांनी अशाप्रकारच्या सत्तास्थापनेतून लोकशाहीचे संकेत पायदळी तुडवल्याचे म्हटले आहे. लोकांना गृहीत धरल जातं, परंतु आजच्या घडामोडींनंतर जनतेचा लोकशाहीवरचा विश्वास उडाला आहे. अशा अभद्र पद्धतीनेही काही होऊ शकतं, हे आता लोकांना कळलंय. हा प्रकार म्हणजे जनतेचा विश्वासघात झालायं, असे म्हणत त्यांनी नाराजी दर्शवली.ज्येष्ठ लेखक, नाटककार अशोक समेळ यांनी तर दिवसभरात घडलेल्या घटना म्हणजे एखाद्या नाटकाप्रमाणे वाटते आणि हे नाटक अजून संपलेलं नाही. ते सुरू राहणार आहे. मुळातच मला या राजकीय घडामोडींवर आधारित एक नाटक लिहावसं वाटतंय, असे मत अशोक समेळ यांनी व्यक्त केले. मात्र गनिमी कावा हा शिवरायांनीही रात्रीच्या काळोखातच केला आणि आता भाजपनेही रात्रीच्या काळोखातच केला. बाकी कोणी कोणासोबत जावून सरकार स्थापन करावे, हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे, असेही अशोक समेळ म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019