शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

१२० कोटी वसुलीचे लक्ष्य गाठणार; उल्हासनगर पालिकेतर्फे नागरिकांकरिता अभय योजना लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 00:39 IST

महापालिका आयुक्तांनी ५ फेब्रु्रवारीपासून अभय योजना लागू करून त्याचा लाभ एक लाखापेक्षा कमी थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांना होणार आहे.

उल्हासनगर : महापालिका आयुक्तांनी ५ फेब्रु्रवारीपासून अभय योजना लागू करून त्याचा लाभ एक लाखापेक्षा कमी थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांना होणार आहे. त्यापेक्षा जास्त मालमत्ता थकबाकीधारकांना फक्त दोन वर्षांचे थकीत मालमत्ताकरावरील विलंब शुल्क माफ होणार आहे. तर, इतरांचे लोकन्यायालयाच्या तडजोडीनंतर निर्णय घेतले जातील, असे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, १२० कोटींचे लक्ष्य पूर्ण करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.उल्हासनगर महापालिका आर्थिक संकटात सापडली असून त्यातून बाहेर काढण्यासाठी पालिका आयुक्तांनी अभय योजना लागू केली.

आयुक्त देशमुख यांनी महापौर लीलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव, स्थायी समिती सभापती राजेश वधारिया, उपायुक्त मदन सोंडे यांच्या उपस्थितीत मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन अभय योजनेची घोषणा केली. एक लाखापेक्षा कमी मालमत्ताकराची थकबाकी असलेल्यांना अभय योजनेचा लाभ मिळणार असून १२० कोटींच्या वसुलीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. अभय योजनेच्या जनजागृतीसाठी रिक्षातून प्रचार, भित्तीपत्रके, बॅनर आदींचा उपयोग करणार आहे. पालिका मालमत्ताकर विभागाची एकूण थकबाकी ४०० कोटी असून त्यापैकी १९५ कोटी विलंब शुल्क आहे.

महापालिकेने अभय योजनेंतर्गत १२० कोटींच्या वसुलीचे लक्ष्य ठेवले असून एक लाखापेक्षा कमी मालमत्ताकर थकबाकी असलेल्यांना ५ ते २४ फेब्रुवारीदरम्यान एकूण मालमत्ताकरावरील सरसकट विलंब शुल्क माफ करण्यात येणार आहे. २५ ते ७ मार्चदरम्यान ७५ टक्के, ८ ते १६ मार्चदरम्यान ५० टक्के व १७ ते २३ मार्चदरम्यान २५ टक्के विलंब शुल्क माफ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.नागरिकांनी अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्तांनी केले असून एका लाखापेक्षा जास्त थकीत मालमत्ताकरधारकांना २०१८-१९ व २०१९-२० वर्षांच्या थकबाकीवरील विलंब शुल्क माफ करण्यात येणार आहे. अभय योजनेचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना मिळणार असून मोठ्या मालमत्ताकर थकबाकीधारकांवर कारवाईचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

आर्थिक डोलारा सावरण्यासाठी योजना

महापालिकेचा आर्थिक डोलारा सावरण्यासाठी अभय योजना लागू केली असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले. एक लाखापेक्षा कमी मालमत्ताकर थकबाकीधारकांना योजनेचा फायदा होणार आहे. तर, एक लाखापेक्षा जास्त थकीत मालमत्ताधारकांना दोन वर्षांचे विलंब शुल्क माफ होणार असून मालमत्ताकर नियमित व वेळेत दिले नाहीतर मालमत्तेची जप्ती, लिलाव आदी कारवाई केली जाणार आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरthaneठाणेMaharashtraमहाराष्ट्र