शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीच्या रखडलेल्या विकासकामांबाबत आमदार रविंद्र चव्हाण यांचा आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 18:12 IST

कल्याण डोंबिवलीतील रखडलेल्या विविध विकासकामांबाबत डोंबिवलीचे आमदार आणि माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

डोंबिवली - कल्याण डोंबिवलीतील रखडलेल्या विविध विकासकामांबाबत डोंबिवलीचे आमदार आणि माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. आमदार चव्हाण यांनी या विकासकामांबाबत सोमवारी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांना माहिती देताना प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर आसूड ओढत हा आंदोलनाचा इशारा दिला.

आमदार  चव्हाण यांनी आयुक्तांसमवेत झालेल्या बैठकीत आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड, कोपर रेल्वे पूल, डोंबिवलीतील सूतिकागृह, शास्त्रीनगर आणि रुख्मिणीबाई रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था, 27 गावातील रखडलेली अमृत योजना, पावसाळ्यात रस्त्यावर पडणारे खड्डे, डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या जोशी हायस्कूलजवळील पुलाचे काम, ठाकुर्ली स्टेशनच्या दिशेने रखडलेला रस्ता, जोशी हायस्कुलजवळील पुलावरून 90 फूट रस्त्याला मिळणाऱ्या एलिव्हेटेड पुलाचे रखडलेले काम, केडीएमसीच्या डोंबिवली पूर्व विभागीय कार्यालयाच्या ठिकाणी पार्किंग प्लाझा-कार्यालयांची व्यवस्थेबाबत निविदा, डोंबिवली पूर्वेतील पाटकर प्लाझामध्ये रिक्षा स्टँड त्वरित सुरू करणे, डोंबिवली पश्चिमेत नविन मच्छी मार्केट बांधणे, डोंबिवली शहरातील वाढते नागरीकरण लक्षात घेता पश्चिमेला वीज उपकेंद्रासाठी जागा उपलब्ध करून देणे, स्मार्टसिटी योजनेंतर्गत 300 कोटी रुपये येऊनही एकही काम सुरू नाही, सुरक्षेबरोबरच स्वच्छतेसाठी कचरा पडत असणाऱ्या ठिकाणांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवा, केडीएमसी हद्दीतील भुयारी गटारांची, मल-जल शुद्धीकरणाची रखडलेली कामे, झोपडपट्टीत वाईट अवस्थेत असणारी शौचालये तातडीने बांधावीत, शास्त्रीनगर रुग्णालयात शव विच्छेदन कक्ष सुरू करण्यासाठी तातडीने पावले उचलावी आणि कल्याण डोंबिवलीतील महत्वाकांक्षी रिंगरोड प्रकल्पाला गती येण्यासाठी विशेष अधिकारी नेमण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच 27 गावातील नागरिकांना सध्या आकारण्यात येत असलेला कर हा अन्यायकारक असून त्याबाबत फेरविचार करणे आवश्यक असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीthaneठाणे