शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

ठाणे जिल्ह्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या ९०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाचे काम जलद गतीने करा, रवींद्र चव्हाण यांचे आदेश

By सुरेश लोखंडे | Updated: August 23, 2022 12:43 IST

Thane Hospital: जिल्ह्याभरासाठी अतिशय महत्वाच्या अशा ९०० खाटांचे जिल्हा संदर्भ सेवा रुग्णालय, परिचारिका प्रशिक्षण केंद्र व वसतीगृहाचे बांधकाम प्रस्तावित बहुमजली इमारतीच्या कामाला तत्काळ गती देऊन तातडीने पूर्ण करा.

- सुरेश लोखंडे  ठाणे  - जिल्ह्याभरासाठी अतिशय महत्वाच्या अशा ९०० खाटांचे जिल्हा संदर्भ सेवा रुग्णालय, परिचारिका प्रशिक्षण केंद्र व वसतीगृहाचे बांधकाम प्रस्तावित बहुमजली इमारतीच्या कामाला तत्काळ गती देऊन तातडीने पूर्ण करा. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी निश्चित करून याबाबत अधिक वेगाने कामे करा, असे नवनिर्वाचित सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनासह संबंधित विभागांना दिले.

सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या उच्चस्तरीय अधिकारी वर्गाच्या बैठकीत चव्हाण यांनी पुढील दीड वर्षात जिल्हा रुग्णालय सेवेत येईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. प्रामुख्याने जमिनीच्या मालमत्ता पत्रकावर सरंक्षण विभागाऐवजी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभाग जिल्हा शल्यचिकित्सक ठाणे यांची नोंद होणे, रुग्णालय बांधकामास पालिकेने तात्काळ मंजुरी देणे, पर्यावरण खात्याची मंजुरी आणणे, अग्निशमन दलाची परवानगी आणणे, इमारतीस अडथळा होणारी झाडे तोडणे अशा विविध कामांचे प्रशासकीय मान्यता मिळविण्याचे निर्देशही चव्हाण यांनी या बैठकीत दिले.

 सिव्हिल रुग्णालयाच्या निविदापूर्व प्रक्रियेतील  प्रशासकीय अडथळ्यांचा निपटारा करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. रुग्णालयाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून ठाणे शहरासह जिल्ह्यातील इतर तालुके व ग्रामीण भागातील रुग्णांना या प्रस्तावित बहुमजली बहुउद्देशीय रुग्णालयाचा फायदा होणार आहे. त्यामुळे या रुग्णालयाचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश चव्हाण यांनी जारी केले आहेत.

जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, ठाणे महानगरपालिका, भूमी अभिलेख कार्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कार्यकक्षेतील विविध कामांचा आढावा चव्हाण यांनी या बैठकीत घेतला.यावेळी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) एस.एस. साळुंखे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, भूमी अभिलेख उप अधीक्षक योगेश सावकार, महापालिकेचे सहाय्यक नगर नियोजनकार सतीश उईके, अशोक राजमाने, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठाणेचे कार्यकारी अभियंता सुनील पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेhospitalहॉस्पिटल