शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

ठाण्याच्या बालमहोत्सवात बालकलाकारांनी उडवली धम्माल, रवी पटवर्धन यांचा विशेष सत्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 01:32 IST

लहानमुलांचे मनोरंजनात्मक खेळ, पपेट शो, पालक - पाल्य संवाद, आकर्षक भेटवस्तू, लहान मुलांचे सूत्रसंचालन, बालप्रेक्षकांची तुफान गर्दी, आणि भव्य पारितोषिक सोहळा या विविध कार्यक्रमांनी रविवारचा बालमहोत्सव हसतखेळत आणि उत्साहात रंगला.

ठाणे : लहानमुलांचे मनोरंजनात्मक खेळ, पपेट शो, पालक - पाल्य संवाद, आकर्षक भेटवस्तू, लहान मुलांचे सूत्रसंचालन, बालप्रेक्षकांची तुफान गर्दी, आणि भव्य पारितोषिक सोहळा या विविध कार्यक्रमांनी रविवारचा बालमहोत्सव हसतखेळत आणि उत्साहात रंगला. यावेळी बालनाट्यापासून आपल्या अभिनयाची सुरूवात करणारे ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचा विशेष सत्कार करण्यात आला. आपल्या सत्काराला उत्तर देताना पटवर्धन यांनी प्रारंभ कला अ‍ॅकॅडमी आणि त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.प्रारंभ कला अ‍ॅकॅडमी आणि भूमी वर्ल्ड यांच्यावतीने रविवारी गडकरी रंगायतन येथे हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, बालरंगभूमीसाठी सातत्याने योगदान देणाऱ्या राजू तुलालवार, प्रबोध कुलकर्णी, प्रा. मंदार टिल्लू, प्रविणकुमार भारदे, किरण नाकती या पाच महागुरूंचा सत्कार करण्यात आला.विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले नरेश म्हस्के म्हणाले की, भावी पिढीला संस्कार देण्याचे काम ही मंचावरील सगळी मंडळी नि:स्वार्थीपणे करीत आहेत, म्हणूनच ती पुरस्काराला पात्र आहेत. अशा मंडळींचे कौतुक करणे हेच आमचे काम आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. तुलालवार म्हणाले की, बालक्षेत्रात काम करणाºया शहरांत ठाणे अव्वल आहे. सर्वाधिक नाट्यसंस्था याच शहरात आहेत. वर्षाला सर्वाधिक नाट्यप्रयोग याच शहरात होतात. या पुरस्कारामुळे आमची जबाबदारी अणखी वाढली आहे. अ‍ॅकॅडमीच्या संचालिका डॉ. अरुंधती भालेराव यांनी बालकलाकारांना जशी शिस्त असते तशी बालप्रेक्षकांनाही असावी आणि याची जबाबदारी पालकांची असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी मुंबई दूरदर्शनचे जयू भाटकर यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. स्टँडअप कॉमेडीयन अमोल सोनी यांनी लहान मुलांसाठी आकर्षक खेळ घेऊन त्यांचे मनोरंजन केले. आपल्या पाल्याबरोबर वडिलांनी सहभागी होण्याच्या खेळाने तर प्रेक्षकांमध्ये हशा पिकवला. विशेष म्हणजे मुलांनी काढलेल्या चित्रांनी रंगमंच सजविण्यात आला होता. मुलांनी बनविलेल्या टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन रंगमंचासमोर मांडले होते. सिंधुदुर्गच्या चेतन गंगावणे यांनी सादर केलेले कळसुत्री नाटक हे या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.

टॅग्स :thaneठाणे