शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात राष्ट्रवादीने आगपाखड करीत दिला आयुक्तांना जाहीर पाठींबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 17:12 IST

सत्ताधाऱ्यांनी आयुक्तांच्या विरोधात मोर्चा उघडला असतांना शहर राष्ट्रवादीने मात्र आयुक्तांना पाठींबा देत सत्ताधारी केवळ श्रेयासाठीच हे नाटक करत असल्याचा आरोप केला आहे.

ठळक मुद्देशहराचा विकास आयुक्तांमुळेच, राष्ट्रवादीचा दावाचांगल्या कामात शिवसेना दुधात मीठ टाकण्याचे काम करीत आहे

ठाणे - एकीकडे सत्ताधारी शिवसेनेने काही मुद्यावरुंन आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या विरोधात मोहीम उघडून आपली तलवार म्यान करण्याचा निर्णय घेतला असतांनाच आता राष्ट्रवादी कॉंग्रेसने मात्र आयुक्तांच्या भुमिकेचे जणू समर्थनच करत त्यांना जाहीर पाठींबा दर्शविला आहे. त्यामुळे सत्ताधारी शिवसेना आणि आयुक्तांच्या वादात राष्ट्रवादीने आयुक्तांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.             मागील काही दिवसापासून महासभेच्या निमित्ताने आणि रेंटलच्या घराच्या मुद्यावरुन महापौर आणि आयुक्तांमध्ये विस्तवाची ठिणगी पडली आहे. त्यात जलवाहतुकीचे सादरीकरण करतांना लोकप्रतिनिधींना डावलल्याने सत्ताधाऱ्यांनी एक प्रकारे प्रशासनाच्या विरोधात मोर्चा उघडल्याचे दिसून आले होते. परंतु येत्या काही महिन्यांवर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका येऊ घातल्या असल्याने त्याचा फटका आपल्याला बसू शकतो, आणि आयुक्त गेले तर काही प्रकल्प देखील रखडू शकतात म्हणूनच की काय शिवसेनेने आयुक्तांच्या विरोधात उघडलेला मोर्चा मागे घेण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. येत्या काही दिवसात या वादावर पडदा पडण्याची चिन्हे देखील शिवसेनेने दिली आहेत. असे असतांना आता विरोधकांनी मात्र सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आक्रमक पावित्रा घेतला असून आयुक्तांच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. जे प्रकल्प मार्गी लावलेच नाहीत, किंवा ज्यासाठी प्रयत्नच करण्यात आले नाहीत, अशा प्रकल्पांचे श्रेय घेण्यासाठीचा हा अट्टाहास असल्याचा आरोप शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसने केला आहे. तर आयुक्तांना पाठींबा देतांना जे आयुक्त दिवसातील २० -२० तास काम करतात त्यांच्या बाबत अशा पध्दतीने शंका उपस्थित करणे चुकीचे असल्याचे मतही राष्ट्रवादीने व्यक्त केले आहे. नागला बंदर पासून ते आनंद नगर जकात नाक्यापर्यंत आणि खिडकाळी पासून ते वागळे इस्टेटच्या डोंगरापर्यंत अशा दाही दिशांना विकासाची गंगा वाहत आहे. या शहराती सर्व सामान्य नागरीकांना शहरात असलेल्या विकासाचा फायदा होतांना दिसत आहे. त्यांची जीवनशैली सुधारत आहे. असे असतांना सत्ताधारी शिवसेनेने अशा पध्दतीने चांगल्या कामात दुधात मीठ टाकण्याचाच प्रयत्न केल्याचा टोलाही शिवसेनेला लगावला आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेस