शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर महापालिका अग्निशमन दलाच्या ४ अधिकाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 18:21 IST

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शिवसेना नेते धनंजय बोडारे आदींनी राष्ट्रपती शौर्य पुरस्कार विजेत्या अधिकाऱ्यांचा जाहीर सत्कार केला.

उल्हासनगर- देशभरात अग्निशमन दलाच्या २५ जणांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झाले आहे. यांपैकी ८ जण हे महाराष्ट्रातील असून यातील ४ राष्ट्रपती शौर्य पुरस्कार विजेते उल्हासनगर महापालिका अग्निशमन दलातील अधिकारी आहेत. यात महापालिका अग्निशमन दलाचे प्रमुख बाळू नेटके, उपअग्निशमन अधिकारी पंकज पवार, स्टेशन अधिकारी संदीप आसेकर व राजेंद्र राजन यांचा समावेश आहे. त्यांना स्वातंत्र दिनानिमित्त राष्ट्रपती शौर्य पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यांच्यावर सर्वस्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

उल्हासनगरात धोकादायक इमारतीचे स्लॅब कोसळण्याचे सत्र सुरू असून या दुर्घटनेत अनेकांचे बळी गेले. अशावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, इमारत स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्याना बाहेर काढण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. तसेच वालधुनी व उल्हास नदीच्या पुराच्या पाण्यातून शेकडो नागरिकांना बाहेर काढण्याचे काम अग्निशमन दलाच्या जवानांनी केले. याची दखल शासनस्तरावर घेऊन विभागाच्या या चार जणांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कार जाहीर झाल्याची प्रतिक्रिया अग्निशमन दलाचे प्रमुख व शौर्य पुरस्कार विजेते बाळू नेटके यांनी दिली. 

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शिवसेना नेते धनंजय बोडारे आदींनी राष्ट्रपती शौर्य पुरस्कार विजेत्या अधिकाऱ्यांचा जाहीर सत्कार केला. महापौर लिलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव, स्थायी समिती सभापती टोनी सिरवानी, सभागृहनेते भारत गंगोत्री, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, आयुक्त डॉ राजा दयानिधी, अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर, उपायुक्त अशोक नाईकवाडे आदींनी शुभेच्छा दिल्या. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एकाच वेळी एकाच विभागाच्या चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कार मिळाले. या अधिकाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर होताच, सर्वस्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

अग्निशमन दलात कंत्राटी जवांनाचा भरणा? महापालिका अग्निशमन विभागात वर्षानुवर्षे भरती न झाल्याने, ७० टक्के पेक्षा जास्त जुने अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी महापालिकेने ठेक्याने व कंत्राटी पद्धतीने जवान घेतले. मात्र अग्निशमन दलाचे प्रमुख बाळू नेटके यांच्या सकारात्मक कार्यपद्धतीमुळे अग्निशमन दलाची कामगिरी चमकदार व डोळ्यात भरण्या जोगी आहे. महापालिका प्रशासनाने विभागाची अशीच कामगिरी राहण्यासाठी कंत्राटी जवांनाना महापालिका सेवेत कायम करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरFire Brigadeअग्निशमन दल