ठाणे : आजारी भाच्याला पाहण्यासाठी आलेल्या सावत्र मामाने घरात कोणी नसल्याचे पाहून सतरावर्षीय भाचीवर अत्याचार करून तिला साडेपाच महिन्यांची गरोदर केल्याची घटना ठाण्यात समोर आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या मामाला वागळे इस्टेट पोलिसांनी शुक्रवारी नवी मुंबईतून अटक केली.ठाणे, वागळे इस्टेट परिसरातील पीडित मुलीचा भाऊ आजारी असल्याने त्याला पाहण्यासाठी १८ फेबु्रवारी २०१८ रोजी वाशी येथील तिचा सावत्र मामा मारुती शेपोंडे (२५) हा त्यांच्या घरी आला होता. दरम्यान, त्याने घरात कोणी नसल्याचे पाहून तिच्यावर अत्याचार केला. तसेच झालेला प्रकार कोणास सांगितला तर बघ, अशी धमकी दिली. दरम्यान, ती साडेपाच महिन्यांची गरोदर राहिली. याप्रकरणी पीडित मुलीने वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात शुक्रवारी धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी त्याचा शोध घेऊन शुक्रवारी नवी मुंबईतून अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए.एस. पठाण यांनी दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) संजय गायकवाड करत आहेत.
भाचीवर अत्याचार करणाऱ्या सावत्र मामास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 02:46 IST