शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथमध्ये अज्ञात बंदुकधा-यानं प्रियकराची हत्या करत प्रेयसीवर केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2018 22:14 IST

अंबरनात चिंचपाडा-नालंबी गाव रस्त्यावर डोंगरावर रात्री 8च्या सुमारास गणेश नावाचा तरुण आपल्या प्रेयसीसोबत दुचाकीवर बसून बोलत होता. यावेळी आलेल्या एका तरुणाने त्या दोघांना बंदुकीचा धाक दाखवत त्यांच्याकडून पैशांची मागणी केली.

अंबरनाथ : अंबरनाथ चिंचपाडा-नालंबी गाव रस्त्यावर डोंगरावर रात्री 8च्या सुमारास गणेश नावाचा तरुण आपल्या प्रेयसीसोबत दुचाकीवर बसून बोलत होता. यावेळी आलेल्या एका तरुणाने त्या दोघांना बंदुकीचा धाक दाखवत त्यांच्याकडून पैशांची मागणी केली. त्यानंतर त्या प्रियकरांच्या छातीवर बंदूक ठेवत त्याला घाबरविले. तसेच त्या तरुणाच्या प्रेयसीवर जबरदस्तीने बलात्कार केला. त्यास प्रियकराने विरोध करताच बंदुकधारी लुटारुने त्या तरुणावर गोळीबार केला. त्यात त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.अंबरनाथ पश्चिम भागातील चिंचपाडा ते नालंबी हा रस्ता रात्रीच्या वेळी सुमसाम असतो. या रस्त्यावर जास्त रहदारी नसल्याने आणि डोंगराळ भाग असल्याने हवेशीर ठिकाणी अनेक तरुण आणि ज्येष्ठ नागरिक या भागात येत असतात. मात्र याच रस्त्याच्या पुढच्या भागात अनेक जोडपी एकांत शोधत दुचाकीवर बसून गप्पा मारत असतात. अशाच प्रकारे शहापूर अस्नोली गावात राहणारा तरुण गणेश दिनकर हा आपल्या प्रेयसीसोबत अंबरनाथच्या नालंबी येथील रस्त्याच्या बाजूला बसला होता.गणेश हा शहापूरचा रहिवासी असला तरी आपल्या नातेवाईकाच्या चायनिजच्या दुकानात काम पाहत होता. त्यामुळे त्याचे वास्तव्य अंबरनाथचेच होते. गणेश आणि तिच्या प्रेयसीचे गेल्या 7 वर्षांपासून प्रेमसंबंधी होते. गणेश हा आपल्या नातेवाईकाची बुलेट गाडी घरातून काढून बाहेर पडला. प्रेयसीला सोबत घेऊन तो त्या डोंगरावर बसलेला असताना एक करुण मागून आला. त्याने बंदुकीचा धाक दाखवत त्यांच्याकडून पैशांची आणि बुलेटची चावी मागितली. त्यानंतर गणेशच्या प्रेयसीवर बलात्कार केला. त्याला विरोध करण्यासाठी गणेश पुढे सरसावताच त्या लुटारूने त्याच्यावर गोळीबार करून त्याला जखमी केले.दरम्यान, त्या तरुणीलाही बंदुकीचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार करून पळून गेला, असे पीडित मुलीनेच स्पष्ट केले. आरोपी पळून गेल्यावर त्या तरुणीने येणा-या-जाणा-यांकडे मदत मागितली. त्यानंतर गावातील काही नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घटना टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली असली तरी अंबरनाथ पोलिसांनी प्राथमिक तपास करून गुन्हा त्यांच्याकडे वर्ग केला आहे.

टॅग्स :Molestationविनयभंगambernathअंबरनाथ